आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीने केला जीन्स-टॉप घालण्याचा आग्रह, तिने परिधान केल्यावर घडले त्याच्यासोबत असे काही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीन्स घातल्याने नाराज झालेल्या पत्नीने पतीवर वार केले. - Divya Marathi
जीन्स घातल्याने नाराज झालेल्या पत्नीने पतीवर वार केले.
आग्रा- पत्नीला जीन्स आणि टॉप घालण्यास सांगणे एका पतीला चांगलेच महागात पडले. जीन्स व टॉप घालण्यास सांगितल्याने त्याची पत्नी नाराज झाली. त्यानंतर तिने पतीवर थेट प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर सासरच्यांनी आपल्या सुनेला जबर मारहाण केली.

नेमके काय आहे प्रकरण

- आग्र्यातील भीलमना येथे राहणाऱ्या नेत्रपाल याचे नीतूशी 4 वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. वय कमी असल्याने नीतू सासरी नांदायला गेलेली नव्हती. नीतूला 8 मे रोजी सासरी पाठविण्यात आले होते. 
- शनिवारी रात्री नेत्रपालने आपल्या पत्नीला जीन्स आणि टॉप घालण्यास सांगितले. पतीने तिला जबरदस्तीने जीन्स आणि टॉप घालण्यास भाग पाडले. रात्री एकच्या सुमारास घरातील कोणीतरी नीतूला जीन्स घातल्याचे पाहिले. त्यामुळे नीतू नाराज झाली.
- नाराज नीतूचे रात्री नेत्रपालशी भांडण झाले. भांडण इतके वाढले की नीतूने धारधार शस्त्राने नेत्रपाल वार केले. नेत्रपाल ओरडल्याने घरचे पळत आले आणि त्यांनी नीतूला मारहाण केली.
- पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतर नेत्रपालला रुग्णालयात दाखल केले. नीतूवर प्राथमिक उपचार करुन तिला महिला पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले. याप्रकरणी दोन्ही बाजुकडुन परस्परविरुध्द आरोप करण्यात येत आहेत. 
 
पती-पत्नीचे काय आहे म्हणणे

- नेत्रपालने सांगितले की, त्याच्या पत्नीचे मनिष नावाच्या एका मुलासोबत अफेअर आहे. रात्री तिने जीन्स आणि टॉपवर साडी घातली होती. ती आपल्या प्रियकराबरोबर पळून जाण्याच्या तयारीत होती.
- तिने माझ्याकडे फोन मागितला होता. मी न दिल्याने तिने माझ्यावर हल्ला केला.
- नीतूचे म्हणणे आहे की, नेत्रपालने मला जीन्स घालण्यास सांगितले होते. मी त्याला नकार दिला होता पण त्याने आग्रह कायम ठेवल्याने आपण जीन्स घातली. 

एसएसपीने सांगितले की, प्राथमिक तपासात पत्नी दोषी

- एसएसपी दिनेश चंद्र दूबे यांनी सांगितले की, भीलमना गावात पत्नीने पतीच्या खूनाचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. प्राथमिक तपासात पत्नी दोषी आढळली आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे.