आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन बायका फजिती ऐका; दीरासोबत पार्कमध्ये गेली वहिनी, दुसऱ्या महिलेसोबत फिरत होता पती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांच्या जीपमध्ये रंजित, लाल साडीमध्ये त्याची दुसरी पत्नी आमि मुलांसोबत पहिली पत्नी. - Divya Marathi
पोलिसांच्या जीपमध्ये रंजित, लाल साडीमध्ये त्याची दुसरी पत्नी आमि मुलांसोबत पहिली पत्नी.
पाटणा - रविवारचा सुटीचा दिवस आणि त्यात पावसाळी वातावरण. याच वातावरणात रंजीत कुमार त्याच्या दुसऱ्या पत्नीला घेऊन प्राणीसंग्रहालयात पोहोचला. जवळपास दोन तास दोघे फिरत होते. आइस्क्रिम पासून पॉपकॉर्न आणि चाटचा मजा घेत होते. रंजित कुमारला याची जराशीही चाहूल लागली नाही की त्याचा भाऊ आणि पहिली पत्नी त्याच्या मागावर आहेत आणि तेही पार्कमध्ये पोहोचले आहे. जशी संधी मिळाली रंजितच्या पहिल्या पत्नीने त्याची कॉलर पकडली आणि त्याच्या श्रीमुखात भडकवण्यास सुरुवात केली. 
 
पहिलीने चोपले, दुसरीने दाखल केला फसवणूकीचा गुन्हा
- रंजित आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीला जेव्हा त्याच्या पहिल्या पत्नीने रंगेहाथ पकडले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. 
- दुसऱ्या पत्नीसमोर इंम्प्रेशन जमवण्यासाठी त्याने भावाला विचारले मुला-बाळांसह तू येथे काय करतो? 
- तेव्हा पहिल्या पत्नीने विचारले ही कोण आहे? रंजित म्हणाला - माझी मैत्रिण आहे. तर मग तिने सिंदूर का लावला आहे? 
- नवरा-बायकोतील हे प्रश्नोत्तरे सुरु असतानाच रंजितच्या भावाने त्याला व त्याच्यासोबतच्या महिलेला शिव्या-शाप देण्यास सुरुवात केली.
- भावा-भावांतील शाब्दिक चकमक हाता-पायांवर आली. रंजितने भावाला मारण्यासाठी कमरेचा बेल्ट काढला तर, त्याच्या पहिल्या पत्नीने त्याची कॉलर पकडून त्याला मारण्यास सुरुवात केली. माग रंजितच्या भावानेही त्याला लाथा-बुक्यांचा प्रसाद दिला. 
 
दुसरी पत्नी म्हणाली मला धोका दिला...
- पार्कमध्ये सुरु असलेले पती-पत्नीचे हे भांडण अखेर पोलिस स्टेशनला पोहोचले. सचिवालयाचे पोलिस पार्कमध्ये पोहोचले. रंजित त्याच्या दोन्ही बायका आणि मुलांना पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले.  पोलिस स्टेशनमध्ये प्रकरण आपसात मिटवण्याचे प्रयत्न सुरु झाले. 
- तेव्हा दुसरी पत्नी म्हणाली माझ्यासोबत धोकेबाजी झाली आहे. तिने रंजितवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. 
- ठाणे अंमलदार आर.के. दुबे म्हणाले, की दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरुन एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रंजितला अटक करण्यात आली आहे. सोमवारी त्याला कोर्टात हजर करुन जेलमध्ये पाठवण्यात आले. 
 
चार महिन्याआधी केले दुसरे लग्न 
- रंजित कुमार एका खासगी कंपनीत काम करतो. दहा वर्षांपूर्वी त्याचे पहिले लग्न झाले होते. त्याला दोन मुले आहेत. पहिली पत्नी गावी राहात होती. 
- काही महिन्यांपासून पुनपुन येथील एका मुलीसोबत रंजितचे सुत जुळले होते. दोघांनी लवकरच लग्न करण्याचाही निर्णय घेतला. 
- मात्र रंजितने या तरुणीला त्याच्या पहिल्या पत्नी आणि मुलांबद्दल काहीच सांगितले नाही. याच वर्षी मार्चमध्ये रंजितने दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीसोबत तो पाटण्यातील रामकृष्णनगरमध्ये राहात होता. 
बातम्या आणखी आहेत...