आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Wife Drape Fall Husband Shaved Hair Mau Varanasi Uttar Pradesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केवळ डोक्यावरून पदर पडल्याने बायकोला बेदम मारहाण, टक्कल करून बाजारातून फिरवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मऊ/वाराणसी - येथे एका महिलेबरोबर अमानवी कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. नगपूर गावात एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला अत्यंत क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याचे समोर आले आहे. स्वयंपाक करताना केवळ डोक्यावरून पदर पडला म्हणून या व्यक्तीने बायकोला बेदम मारहाण केली. तसेच त्यानंतर तिचे टक्कल करून तिला बाजारातून फिरवले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशीरा तिच्या पतीला अटक केली.

सुमन (नाव बदललेले) हिचे सौदर्य पाहूनच मुन्ना चौहानने तिच्याबरोबर विवाह केला होता. लग्नाच्या काही दिवसांपर्यंत सर्वकाही ठिक होते. पण हळू हळू त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. अशा स्थितीत त्याने तिच्यावर अनेक बंधने लादायला सुरुवात केली. घरातही डोक्यावर पदर न घेता वावरणे त्याला आवडत नव्हते. त्यामुळे या दोघांमध्ये वारंवार वाद होते होते.

रविवारी सायंकाळी उशीरा मुन्ना चौहान जेव्हा कामावरून घरी परतला त्यावेळी त्याची पत्नी सुमन स्वयंपाक करत होती. घरात असतानाही डौक्यावरचा पदर काढायचा नाही असे स्पष्ट निर्देश सुमनला देण्यात आलेले होते. पण तरीही स्वयंपाक करताना सुमनच्या डोक्यावरचा पदर खाली पडला. त्यामुळे रागात तिच्या नवर्‍याने लाथा बुक्क्यांनी तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिच्या केसांना धरून तिला ओढत बाहेर घेऊन गेला. तिचे मुंडन केले आणि त्याच अवस्थेत तिला संपूर्ण बाजारात फिरवले. एवढा प्रकार झाला तरीही गावातील लोक शांत होते. त्यानंतर तिचा नवरा तिला घरी घेऊन आला आणि पुन्हा तिला मारहाण सुरू केली.

म्हणे, लोकांनी तक्रारी केल्या होत्या...
मुन्ना चौहान शेतात मजुरी करतो. त्याला दोन मुलेही आहेत. इतर पुरुष वाईट नजर ठेवतात म्हणून वायकोला वारंवार समज दिली होती. तसेच तिला चांगले कपडे परिधान करून पदर ठेवायचा असे सांगितल्याचेही मुन्ना म्हणाला. पण त्याची बायको त्याचे ऐवत नव्हती. अनेक लोकांनी तिच्या चारित्र्याबाबत आपल्याकडे तक्रारी केल्या होत्या, असे त्याने सांगितले.