आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरी आल्यावर 15 दिवसही जगू शकली नाही, कळले होते पतीचे 'हे' रहस्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरा (बिहार) - शाहपूर परिसरात शनिवारी रात्री उशिरा एक नवविवाहितेचा पंख्याला लटकावून खून करण्यात आला. सूत्रांनुसार, महिलेचे 7 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनी ती माहेरी गेली होती, 7 दिवसांपूर्वीच ती पुन्हा सासरी परतली होती.
 
अवैध संबंधांचे सांगितले जात आहे कारण...
- रविवारी सकाळी तीन मजली घराच्या ग्राउंड फ्लोअरवर नवविवाहितेचा मृतदेह आढळला.
- याप्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांनी तिचा पती, सासू-सासरे आणि पाच जणांवर छळ आणि खुनाची केस दाखल केली आहे.
- मृत 20 वर्षीय पूजा ईश्वरपुरात राहणाऱ्या रेल्वे कर्मचारी मनोज कुमार यांची पत्नी होती.
- पूजाच्या मानेवर जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. खुनाचे कारण अवैध संबंधांना विरोध असे सांगितले जात आहे.
 
खेालीत पंख्याला लटकलेला आढळला पूजाचा मृतदेह
- घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी शंभू कुमार गावात पोहोचले.
- येथे मृत पूजाचा मृतदेह उतरवण्यात आला. पोलिस आले तेव्हा पूजा सिलिंग फॅनला लटकलेली होती. मानेवर पांढऱ्या रंगाचा गमछा बांधलेला होता. तोही जप्त करण्यात आला.
 
15 दिवसांपूर्वीच माहेरातून आली होती सासरी
- सूत्रांनुसार, दुर्गादत्त सिंह यांची मुलगी पूजाचे लग्न 29 एप्रिल 2017 रोजी मनोज कुमार यांच्याशी झाले होते. 
- वडिलांचा आरोप आहे की, लग्नानंतर लगेच मुलीचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला. त्यांची मागणी पूर्ण न झाल्याने तिचा खून करण्यात आला.
- ते म्हणाले, 28 ऑक्टोबर रोजी मुलगी माहेरातून आपल्या सासरी आली होती. दीड एकर जमीन विकून तिचे लग्न केले होते.
- ते म्हणाले, जावयाचे नात्यातीलच एका मुलीशी अवैध संबंध सुरू होते. याची आम्हाला आधी कल्पना नव्हती. माझी मुलगी त्याला विरोध करत होती.
- नुकताच 8 नोव्हेंबरला जावई सुटी घेऊन गावी आला होता. तीन दिवस त्यांनी मुलीचा छळ केला. यादरम्यान तिचा खून करण्यात आला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...