आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला होती पतीची अडचण, प्रियकराला नवरा भेटू देत नाही म्हणून उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारमध्ये दीपकचा मृतदेह. इन्सेट त्याची पत्नी. - Divya Marathi
कारमध्ये दीपकचा मृतदेह. इन्सेट त्याची पत्नी.
गया - पत्नीच्या अवैध संबंधांत अडथळा ठरत असल्याने पतीचा गळा चिरून खून करण्यात आला. पतीचा मृतदेह कारमध्ये आढळला. मृताचे नाव दीपक कुमार आहे. दीपकच्या घरच्यांनी त्याच्या खुनासाठी सुनेलाच जबाबदार ठरवले आहे. नातेवाइकांचा आरोप आहे की, दीपकची पत्नी प्रियंकानेच अवैध संबंधांमुळे त्याचा खून घडवून आणला.
 
4 वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह...
- ही घटना गया जिल्ह्याच्या रामपूर परिसरातील आहे. मंगळवारी सकाळी घरासमोर पार्क केलेल्या कारमधून दीपकचा मृतदेह आढळला. कुटुंबीयांनी सांगितले, दीपक आणि प्रियंकाने 4 वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज केले होते. 3 वर्षे दोघांचे नाते ठीकठाक होते, परंतु नंतर दोघांत वाद होऊ लागले. यादरम्यान प्रियंकाचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. ती पती आणि सासरच्या लोकांना लपूनछपून आपल्या प्रियकराला भेटायला जात होती.
- दीपकला जेव्हा या संबंधांची कुणकुण लागली तेव्हा त्याने तिला रोखले आणि विरोध केला. प्रियकराला भेटायला बंदी घातल्याने प्रियंकाने पतीच्या खुनाचा कट रचला.
- काही दिवसांपूर्वी रात्री झोपेत असताना दीपकच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. पण यादरम्यान दीपकचा डोळा उघडला, यामुळे तो वाचला. दीपकच्या भावाने म्हटले की, प्रियंकाला माहितीये की खून कोणी केला, पण ती तोंड उघडत नाहीये.
 
कॉल करून घराबाहेर बोलावले, सकाळी आढळला मृतदेह
- दीपक किरायाने कार चालवत होता. सोमवारी रात्री त्याला कुणीतरी कॉल करून घराबाहेर बोलावले होते. कॉल करणाऱ्याने म्हटले की, कारमधून कुठेतरी जायचे आहे. खूनी अगोदर घात लावून बसले होते. दीपक कार जवळ येताच त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. धारदार हत्याराने दीपकचा गळा चिरून त्याचा खून केला. यानंतर त्याचा मृतदेह कारमध्येच ठेवला.
- पोलिस प्रकरणाच्या तपासाला लागले आहेत. 
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, प्रकरणाशी निगडित आणखी Photos...
बातम्या आणखी आहेत...