आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wife Killed His Husband In Love Affair In Ludhiana Punjab

गुंगीचे औषध देऊन पत्नीने पतीला घरातच गाडले, शेजार्‍यांकडून पैसे घेऊन त्यावर बसवली फरशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना - पती पत्नीमधील भांडणानंतर येथील एका पत्नीने पतीला बेशुद्धीच्या अवस्थेत घरातच जिवंत गाडले आणि त्यावर फरशी बसवल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्ह्या नंतर कोणताही पूरावा राहू नये याची काळजी घेणारी पत्नी आता तुरुंगाच्या कोठडीत आहे. लुधियाना कोर्टाने आरोपी महिलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण
लुधियाना येथील बिंदरकौर या महिलेने गायक पती राजिंदर याला चहा आणि जेवणातून गुंगीचे औषध दिले. यामुळे शुद्ध हरपलेल्या राजिंदरला घरातच खड्डा करुन अर्धमेल्या अवस्थेत गाडेल. हे कृत्य करण्याआधी बिंदरकौरने मुलांना आत्याच्या घरी पाठवले होते. पतीला जिवंत गाडल्यानंतर बिंदरकौरने शेजार्‍यांकडून पैसे गोळाकरुन तिथे फरशी बसवली आणि राजिंदर बेपत्ता झाल्याची अवई उठवली. घटनेच्या अनेक दिवसानंतर तिने मुलांना परत घरी बोलवले.
राजिंदर गायक असल्याने एका गायिकेसोबत फरार झाल्याचे आरोपी महिलेने लोकांना सांगितले. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी बिंदरकौरने पोलिस तपासात सांगितले, की कोणताही पुरावा राहू नये या हेतूने लागलीच फरशी बसवली आणि त्यावर भिंतही उभे केली. पती बेपत्ता झाल्यामुळे घराची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आली आहे, असे सांगून बिंदरकौर कामाच्या शोधात काही दिवस अमृतसरलाही गेली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिंदर आणि राजिंदर यांच्यात घरात खटके उडत होते. रोजचे भांडण आणि मारहाणीला ती कंटाळली होती. या भांडणामुळे त्यांच्या नात्यातही दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळेच बिंदरकौरने पती राजिंदरला संपवण्याचा कट रचला. तिने जवळपास 50 झोपेच्या गोळ्या बारीक वाटून त्याच्या चहा आणि जेवणात मिसळल्या. गुंगीच्या औषधाने आपला परिणाम दाखविला आणि बिंदरकौरने पतीला घरातच पुरले.
दोन दिवसांची पोलिस कोठडी
या प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलिसांनी बिंदरकौरला कोर्टात हजर केल्यानंतर या घटनेत तिच्या सोबत आणखी कोण होते, त्यासाठी शस्त्रांस्त्राचा वापर केला होता का, केवळ घरगुती भांडणातून हा गुन्हा घडला की, त्यामागे दूसरे काही कारण आहे, महिलेचा इतर पुरुषासोबत संबंध आहे का, की तिच्या पतीचा दुसर्‍या महिलेसोबत संबंध होता, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आरोपी महिलेच्या कोठडीची मागणी केली.
सांगाड्याचीही तपासणी करणार
पोलिसांच्या माहितीनुसार, घरात सापडलेला सागांडा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. हा सांगाडा पुरुषाचा आहे, की महिलेचा याचाही शोध घेतला जात आहे. सांगाड्याचे सर्व अवयव पुरताना सुरक्षीत होते की त्यासोत काही छेडछाड केली गेली, याचाही पोलिस तपास करत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, PHOTOS