आग्रा - लग्नापूर्वी आपली पत्नी दोन महिन्याची गर्भवती असल्याचे एका व्यक्तीला कळाले. तरीही त्याच्या कुटुंबीयांनी तिचा स्वीकार केला. मात्र, लग्नाच्या सहा महिन्यानंतर तिने छातीवर बसून चाकूने त्याचा खून केला. रियाज असे मृताचे तर शबाना असे आरोपीचे नाव आहे.
नेमके काय झाले...
- ही घटना आग्रा येथील अबुलाला दर्ग्याजवळ घडली.
- या परिसरात राहणाऱ्या रियाजचे 11 मार्च 2016 रोजी शबानासोबत लग्न झाले.
- लग्नाच्या 15 दिवसानंतर शबानाच्या पोटात दुखत असल्याने त्याने तिला डॉक्टरकडे नेले.
- तिथे शबाना ही 2 महिन्यांची गर्भवती असल्याचे कळाले. हे ऐकून रियाला मोठा धक्का बसला.
- त्या नंतरही रियाज आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला स्वीकारले.
- पण, 15 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजता शबानाने रियाजचा खून केला.
गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस करताहेत टाळाटाळ
शबाना ही रियाजच्या छातीवर चाकू घेऊन वार करताना रियाजच्या कुटुंबीयाने पाहिले. असे असताना पोलिस शबानाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...