आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमीसाठी पतीच्या छातीत खुपसला धारदार चाकू, म्हणाली- जीव घ्यायचा उद्देश नव्हता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ललिताचे दुसऱ्या एका तरुणावर प्रेम होते. तिला त्याच्याशी लग्न करायचे होते. - Divya Marathi
ललिताचे दुसऱ्या एका तरुणावर प्रेम होते. तिला त्याच्याशी लग्न करायचे होते.
बिहारशरीफ (बिहार)- प्रियकरासोबत लग्न न झाल्याने नाराज असलेल्या पत्नीने पतीच्या छातीत भाजी चिरायचा चाकू खुसपला. रक्ताची चिरकांडी उडाली. पती जागेवरच कोसळला. त्यानंतर पत्नी पळून गेली. सुमारे तीन तासांनी शेजारी राहणाऱ्या कुटुंबीयांच्या घरी पत्नी सापडली. पोलिसांनी तिला अटक केली आहे. यावेळी ती म्हणाली, की त्याचा जीव घ्यायचा उद्देश नव्हता. तो केवळ जखमी होईल असे वाटले होते. केवळ त्याला भीती दाखवण्यासाठी चाकू चालवला होता.
घरभर पसरले रक्त
- सतीश कुमार असे पतीचे तर ललिता असे पत्नीचे नाव आहे.
- घटनेच्या दिवशी सतीश कपड्यांना प्रेस करत होता. यावेळी त्याचे ललितासोबत कडाक्याचे भांडण झाले.
- सतीशचे दुमजली घर आहे. वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत तो प्रेस करत होता.
- या दरम्यान तो जिन्याहून खाली आला. ललिता जिन्यातच उभी होती. तिच्या हातात भाजी चिरण्याचा चाकू होता.
- ललिताने लगेच सतीशच्या छातीत चाकू खुपसला. त्यानंतर ती पळून गेली. सोबत चाकूही घेऊन गेली.
- घटनेच्या तीन तासांनी ती शेजऱ्यांचा घरी होती. पोलिसांनी तिला अटक करुन चाकू शोधून आणला.
- एका तरुणावर प्रेम असल्याने तिने हे कृत्य केल्याचे कबुल केले.
मोठी बहिण पळाल्याने लहानीशी लग्न
- सतीशचे लग्न ललिताची मोठी बहिण संगीतासोबत पक्के झाले होते.
- पण लग्नापूर्वी संगीता प्रियकरासोबत पळून गेली. त्यानंतर कुटुंबीयांनी ललिताचे लग्न सतीशसोबत लावून दिले.
- या दोघांमध्ये 15 वर्षांचे अंतर होते. ललिताचे एका युवकावर प्रेम होते. ती त्याच्यासोबत अनेक तास बोलायची.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेशी संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...