आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराशी भेटायला पतीची होती बंदी, माहेरातून परत येताना घडले असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेची कॉल डिटेल आणि कडक चौकशी केल्यावर खुनाचा उलगडा झाला. - Divya Marathi
महिलेची कॉल डिटेल आणि कडक चौकशी केल्यावर खुनाचा उलगडा झाला.
बुलंदशहर - येथे एका विवाहितेने आपल्या प्रियकरासाठी पतीचा खून केला. सोमवारी या प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. 28 ऑक्टोबर रोजी पोलिसांना एका शेतात अनोळखी मृतदेह आढळला होता. मृत व्यक्तीचा चेहरा दगडाने चेंदामेंदा करण्यात आला होता.
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- ही घटना बुलंदशहर जिल्ह्यातील जहांगिराबाद परिसरातील आहे. 28 ऑक्टोबर रोजी हजरतपूर नहर पटरीजवळ शेतात एक अज्ञात मृतदेह आढळला होता.
- इन्स्पेक्टर तपेश्वर सागर म्हणाले, तपासात कळले की, 27 ऑक्टोबरला जहांगिराबाद येथील रहिवासी नरेंद्र सिंह आणि त्याची पत्नी प्रेमवती यांना अज्ञात आरोपींनी कारमधून किडनॅप केले होते. आरोपींनी लूटमार करून पत्नी प्रेमवतीला सोडले, परंतु तिच्या पतीला सोबत घेऊन गेले.
- प्रेमवतीने याप्रकरणी पोलिसांत किडनॅपिंग आणि लूटमारची केस दाखल केली होती. परंतु पोलिसांच्या संशयाची सुई प्रेमवतीवरच येऊन थांबली. जर पती-पत्नी दोघेही किडनॅप झाले असतील, तर आरोपींनी त्याला का सोडले? आरोपींनी कोणतीही डिमांड केल्याशिवाय नरेंद्रची हत्या का केली?
- नरेंद्रची कोणाशीही दुश्मनी नव्हती. यामुळे संशयाच्या आधारे प्रेमवतीला ताब्यात घेण्यात आले आणि कडक चौकशी करण्यात आली. त्याच्या कॉलचे डिटेलही काढण्याची आली. मग पूर्ण सत्य समोर आले.
- प्रेमवती म्हणाली- लग्नानंतर माझी हरकेशशी ओळख झाली. आम्ही दोघेही एकमेकांना पसंत करत होतो. 3 वर्षांपासून आमचे संबंध आहेत. त्याचे घरीही येणे-जाणे होते. आमच्या संबंधांबाबत पती (नरेंद्र)ला कळले होते.
- त्याने प्रियकराचे घरी येणे आणि माझे घराबाहेर जाणे बंद केले होते. म्हणून आम्ही दोघांनी मिळून नरेंद्रचा काटा काढण्याचा कट रचला.
- कटानुसार, काही दिवसांपूर्वी मी माहेरात गेले. 28 ऑक्टोबरला नरेंद्र मला घ्यायला माहेरी आला. आम्ही मोटारसायकलने परत येत होतो. वाटेत हरकेश त्याच्या मित्रांसह उभा होता. हजरतपूर कालव्याजवळ आम्ही सगळ्यांनी मिळून नरेंद्रचा खून केला आणि कोणी ओळखू नये म्हणून त्याचा चेहरा दगडाने चेंदामेंदा केला.
- यानंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून मी स्वत: पोलिसांत जाऊन खोटी तक्रार दिली.
- इन्स्पेक्टर म्हणाले- हरिकेश आणि प्रेमवतीला अटक करण्यात आली आहे. दुसरा एक सहकारी ब्रिजेंद्रचा शोध सुरू आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संंबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...