आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीसोबत महिलांची मंगळसूत्रे लुटली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैतुल - न्यायाधीशांचा नातू आणि वकिलाचा मुलगा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरण्याचा धंदा करायचा, अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे. विशेष म्हणजे त्याला या कामात त्याची पत्नी मदत करत होती. बेरोजगार असल्याने त्यांनी हा व्यवसाय म्हणून निवडल्याचे सांगण्यात येते. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ७५ हजारांची मंगळसूत्रे जप्त करण्यात आली आहेत.
हे जोडपे भोपाळचे रहिवासी असून बैतुल येथे भाड्याच्या घरात राहत होते. बैतुल व इटारसी परिसरात दोघे चोऱ्या करत होते. पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या अार्यन उपाध्याय(२०) व विनीता (२१) या दोघांना अटक केली. अार्यन ऊर्फ शंतनू आणि विनीताने जानेवारी २०१६ मध्ये प्रेमविवाह केला. दोघांनी सांगितले, आमचा व्यापार होता. पण तो चालत नसल्याने व खर्चासाठी पैसे नसल्याने चोरीचा मार्ग निवडला.
बातम्या आणखी आहेत...