आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचे दिराशी होते अवैध संबंध, चिमुकली म्हणाली- मी पाहिले आईने पप्पांचा खून केला..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिराच्या मदतीने महिलेने पतीचा गळा चिरून निर्घृण खून केला. - Divya Marathi
दिराच्या मदतीने महिलेने पतीचा गळा चिरून निर्घृण खून केला.

खगडिया - बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील एका महिलेने आपल्या प्रियकरासह मिळून पतीचा खून केला. प्रियकर अन्य कोणी नसून महिलेचा दीरच आहे. पतीला पत्नीच्या अवैध संबंधांबाबत कळले होते. यानंतर महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा चिरून निर्घृण खून केला. महिलेच्या 10 वर्षीय मुलीने ही घटना पाहिली आणि सर्वांना सांगितले. ,

 

कमावण्यासाठी घराबाहेर राहायचा पती...
- खगडिया जिल्ह्यातील बोरने गावात बुधवारी रात्री नूतनदेवीने आपला दीर अंकुशच्या मदतीने पती पंकज कुमार यादवचा खून केला.
- रात्री उशिरा घरात झोपलेल्या पंकजचा नूतन आणि अंकुशने मिळून धारदार हत्याराने गळा चिरला.
- जीव वाचवण्यासाठी पंकज घराबाहेर पळाला, तेव्हा दोघांनी पाठलाग करून त्याला पकडले. मग तोपर्यंत त्याच्यावर वार केले जोपर्यंत त्याचे श्वास थांबले नाहीत.
- पोलिसांनी गुरुवारी नूतनला अटक केली आहे. तिच्या घरातून पिस्तूल आणि बंदुकीची गोळीही हस्तगत करण्यात आली आहे. आरोपी दीर फरार आहे.

 

हिमाचल प्रदेशात राहायचा पती
- पंकज आणि नूतनचे लग्न 10 वर्षांपूर्वी भागलपूरच्या नवगछियामध्ये झाले होते. दोघांना चार मुले आहेत.
- सूत्रांनुसार, महिलेचा पती हिमाचल प्रदेशच्या कालकामध्ये राहून काम करत होता.
- पत्नी घरीच राहायची. दरम्यान, तिचे दिराशी सूत जुळले. दोघांत अवैध संबंध प्रस्थापित झाले. ही बाब महिलेच्या पतीला कळली, यामुळे त्याने तिला बंधने घातली.
- भावजयी आणि दिराला मात्र एकमेकांपासून दूर राहायचे नव्हते. यामुळे दोघांनी पंकजचा काटा काढण्याचा कट रचला.
- एक डिसेंबर रोजी पंकज हिमाचल प्रदेशातून आपल्या गावात आला होता. यानंतरच नूतन त्याचा काटा काढण्याची संधी शोधत होती.
- नूतनच्या 10 वर्षीय मुलीने पोलिसांना सांगितले की, माझी आई आणि काकानेच पप्पांचा खून केला आहे. हे सर्व मी माझ्या डोळ्यांदेखत पाहिल्याचे चिमुकली म्हणाली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाशी संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...