आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला मारून प्रियकराने विचारले- मुलालाही मारू का? पत्नी म्हणाली, तुझाच तर आहे!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी पत्नी सुषमा हिला पोलिसांनी अटक केली. - Divya Marathi
आरोपी पत्नी सुषमा हिला पोलिसांनी अटक केली.
गोरखपूर- प्रियकरासोबत संगनमत करुन पतीचा खून केल्याच्या आरोपात यूपी पोलिसांनी येथे एका महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी प्रियकरासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. या महिलेला एक 6 वर्षांचा मुलगा आहे. तिने हा मुलगा पतीचा नसून प्रियकराचा असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे.
 
12 वर्षांपासूनचे प्रेम प्रकरण
- वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''35 वर्षीय विवेक प्रताप सिंह याचा खून प्रेम प्रकरणातून झाला असावा. विवेकची पत्नी सुषमा सिंह आणि तिच्या माहेरला राहणाऱ्या डब्लू सिंह या दोघांचे लग्नापूर्वी 12 वर्षांपासून अफेयर होते.''
- ''एवढेच नव्हे, तर सुषमाच्या घरी कुणीही नसताना डब्लू सिंह वेळोवेळी तिच्या घरी यायचा. विवेकला याचा पत्ता लागताच त्याने सुषमाला घराबाहेर पडण्यास मज्जाव केला. तसेच तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली.''
- ''यानंतर कट रचून डब्लू सिंह आणि त्याचे तीन सहकारी सोनू, राधेश्याम आणि अनिल विवेकच्या घरात घुसले. सुषमाच्या मदतीनेच त्या सर्वांनी मिळून विवेकचा खून केला.''
- यानंतर डब्लू सिंह व त्याचे सहकारी सुषमाचा 6 वर्षीय मुलगा आरुषला मारण्यासाठी पुढे गेले. तेवढ्यातच, सुषमा मध्ये पडून म्हणाली, की "मुलाला मारू नकोस, तो तुझाच आहे."

मुलगा बनला प्रत्यक्षदर्शी
- हत्येची घटना घडली त्यावेळी रुममध्ये आरुषदेखील होता. त्याने घडलेला प्रसंग आत्याला सांगितला. 
- पोलिसांच्या माहितीप्रमाणे, आरुष आत्याला म्हणाला, की रात्री मम्मींने रुमचा दरवाजा उघडताच 3 ते 4 काका रुममध्ये घुसले. मी ओरडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी माझे तोंड दाबले. त्यांनी पप्पांचा गळा आवळला. त्यांना बेडच्या खाली फेकून विटांनी मारले. पप्पांचे प्रचंड रक्त वाहत होते. सगळेच काका माझ्या पप्पांना घेऊन गेले आणि मम्मी रुममधील रक्त साफ करत होती. त्याचवेळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.''
 
इमारतीमध्ये कुणालाही कळाले कसे नाही?
- हत्येची एवढी मोठी घटना घडली त्यावेळी कुणालाही याचा पत्ता लागला नाही, हे शक्य तरी कसे आहे? असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. 
- विवेकचा फ्लॅट इमारतीच्या पहिल्या फ्लोअरवर आहे. त्याच्या शेजारच्या अपार्टमेंटमध्ये काका आणि काकू राहत होत्या. मात्र, त्यांनी आपल्याला याबद्दल काहीच माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले. 
- यासोबतच, पीडित विवेकचे आई-वडिलसुद्धा त्याच घरात होते. तरीही, त्यांना या घटनेचा काहीच पत्ता नाही. 
 
गेल्या महिन्यातच तुरुंगातून सुटला
- पोलिसांच्या माहितीप्रमाणे, मुख्य आरोपी आणि सुषमाचा प्रियकर डब्लू सिंह गेल्या महिन्यातच तुरुंगातून सुटला होता. त्याच्याविरुद्ध खूनाचा आरोप होता. त्यासह डब्लूच्याविरुद्ध हत्या आणि दरोड्याचे तब्बल 12 खटले दाखल आहेत. कुख्यात गुंड चंद सिंहच्या टोळीचा तो सदस्य आहे.
बातम्या आणखी आहेत...