आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wife No Response On Whats App Husband Get Her Divorce

व्हाट्सअॅपवर प्रतिसाद नाही म्हणून पत्नीला घटस्फोट !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- सोशल नेटवर्किंगमध्ये सध्या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या व्हाट्सअॅपवर पत्नीने प्रतिसाद दिला नाही म्हणून पतीने घटस्फोट दिल्याचा प्रकार येथे घडला. घटस्फोटाचे कारण देताना पतीने म्हटले आहे की, ‘पत्नी व्हाट्सअॅपवर सतत तिच्या मित्रांबरोबर चॅटिंग करत असे. मात्र, मला प्रतिसाद देत नव्हती. ती व्हाट्सअॅपच्या एवढी आहारी केली होती की तिचे घरकामामध्ये व मुलांकडेही लक्ष नव्हते.

आपली पत्नी दिवसातील दिवसभराचा वेळ मित्रांबरोबर चॅट करण्यात घालवत होती. अनेकदा समज देऊनही तिच्यात काही सुधारणा झाली नाही, अशी या पतिराजांची तक्रार आहे. व्हाट्सअॅपवर तिला अनेकदा मेसेज देऊन समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती मजकूर वाचून त्यावर विचारही करत नव्हती किंवा प्रतिसादही देत नव्हती, असे या पतीचे म्हणणे आहे. एका पाहणीनुसार सन २०११ पासून झालेल्या घटस्फोटांपैकी एक तृतीयांश घटस्फोट हे सोशल नेटवर्किंगमुळे घडले आहेत.