आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या या कामामुळे चर्चेत आले हे IAS अधिकारी, UPSC मध्ये मिळवली होती चौथी रँक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकारी मंगेश घिल्डियाल आणि त्यांची पत्नी ऊषा. - Divya Marathi
जिल्हाधिकारी मंगेश घिल्डियाल आणि त्यांची पत्नी ऊषा.
रुद्रप्रयाग (उत्तराखंड) - रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पत्नीची एक बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'इच्छा तिथे मार्ग' असे म्हटले जाते. याचीच प्रचिती रुद्रप्रयागमध्ये येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याचे लक्षात आले.  जिल्हाधिकाऱ्यांनी यावर कागदी घोडे नाचवण्याऐवजी या समस्येवर काय तोडगा काढता येईल याविषयी पत्नीसोबत चर्चा केली. चर्चेतून जो मार्ग निघाला त्याची आता रुद्रप्रयागमध्ये जोरदार चर्चा होत आहे. 
 
जिल्हाधिकाऱ्यांची पत्नी विद्यार्थिनींना देते विज्ञानाचे धडे 
- रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी मंगेश घिल्डियाल आणि त्यांची पत्नी ऊषा सुयाल सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेत आहेत. 
- रुद्रप्रयागमध्ये पोस्टिंग झाल्यानंतर आएएस मंगेश यांनी एक दिवस शाळांचा दौरा केला. येथील जीजीसीए शाळेच्या चौकशीत समोर आले की शाळेत विज्ञानासह इतरही काही विषयांच्या शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. 
- हा प्रश्न कसा सोडवायचा याची चर्चा जिल्हाधिकाऱ्यांनी पत्नीसोबत केली. त्यानंतर दोघांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल दोघांचे कौतूक होत आहे. 
- ऊषा सुयाल या राजकीय बालिका इंटर कॉलेजमध्ये रोज दोन ते तीन तास शिकवण्याचे काम करत आहेत. त्या मुलींना विज्ञानासह इतरही विषय शिकवतात. 
- जिल्हाधिकारी मंगेश हे देखिल त्यांना जसा वेळ मिळेल तसे शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवत असतात. 
- जिल्हाधिकारी मंगेश आणि त्यांची पत्नी ऊषा यांच्या या उपक्रमाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरल आहे. 
 
काय म्हणाल्या ऊषा सुयाल 
- जिल्हाधिकारी मंगेश म्हणाले की जोपर्यंत शाळेत विज्ञान विषयाच्या शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत ऊषा या विद्यार्थिनींना शिकवणार आहेत. 
- जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पत्नीच्या निर्णयाने कॉलेजच्या प्राचार्य डॉ. ममता नौंटियाल आनंदी आहेत. 
- ऊषा सुयाल या डॉक्टरेट आहेत. त्यांनी पंतनगर येथील गोविंद वल्लभ पंत विद्यापीठातून प्लांट पॅथॉलॉजीमध्ये पी.एडडी केली आहे.
- ऊषा सुयाल या 9वी आणि 10वीच्या विद्यार्थिनींना विज्ञान विषय शिकवतात. दररोज साडेआठ ते साडे अकरापर्यंत त्या कॉलेजमध्ये असतात. 
 
मुख्याध्यापकाचा मुलगा आहे मंगेश घिल्डियाल 
- रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी मंगेश घिल्डियाल हे मूळचे पौडी येथील टांडिया गावातील रहिवासी आहेत. गावातच त्यांचा जन्म झाला. 
- त्यांचे वडील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांचे गावातच झाले. त्यानंतर ते डेहरादूनला गेले. नववी ते ग्रॅज्यूएशनपर्यंतचे शिक्षण तिथेच झाले. 
- कमाऊँ विद्यापीठातून त्यांनी पोस्ट ग्रॅज्यूएशन केले त्यानंतर इंदूर येथील देवी अहिल्या विद्यापीठातून एमटेक झाले. 
- याच दरम्यान लेजर टेक्निकमध्ये त्यांनी संशोधन केले आणि त्यांना शास्त्रज्ञम्हणून नियुक्ती मिळाली. 
- 2010 मध्ये त्यांनी सर्वप्रथम लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. यासाठी त्यांनी कोणतेही कोचिंग घेतले नाही. पहिल्याच प्रयत्नात मंगेश यांना 131 रँक मिळाली. त्यांची निवड झाल्यानंतर पोलिस प्रशिक्षणासाठी हैदराबादला पाठवण्यात आले. 
- मात्र मंगेश तेवढ्यावर थांबेल नाही. त्यांना आएएस बनायचे होते. त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. 2011मध्ये त्यांना चौथी रँक मिळाली. 
- त्यांनी उत्तराखंड कॅडरची निवड केली. त्यांची पहिली पोस्टिंग चमोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली होती.