आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅशनल कबड्डीपटूच्या WIFE ची आत्महत्या, लिहिले- तो म्हणायचा आयुष्यातून जा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नॅशनल कबड्डी खेळाडू रोहित चिल्लरच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी सायंकाळी 27 वर्षांच्या ललिताला घरात लटकलेले पाहाण्यात आले. ललिताने लिहून ठेवलेल्या सुसाइड नोटमध्ये पती आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यात लिहिले, 'रोहितने मला फार त्रास दिला आहे. दुःख दिले आहे. त्याने मला फार रडवले आणि म्हणत होता की माझ्या आनंदासाठी तु माझ्या आयुष्यातून चालती हो.'

7 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न
- मीडिया रिपोर्टनूसार, रोहित कबड्डीचा गड समजल्या जाणाऱ्या दिल्लीतील निजामपूर गावचा रहिवासी आहे.
- पोलिस उपायुक्त विजय कुमार यांनी सांगितले, 'रोहित-ललिताचे लग्न याच वर्षी मार्चमध्ये झाले होते. सुसाइड नोटमध्ये ललिताने पती आणि सासरल्या लोकांवर मारझोडीचा आरोप केला आहे. अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही.'
- रोहित स्पोर्ट्स कोट्यातून नेव्हीमध्ये एसजीपीओ (हेड कॉन्स्टेबल) पदावर आहे.
प्रो कबड्डी टीममध्ये होता रोहित
- नॅशनल प्लेयर रोहित प्रो-कबड्डी लीगमध्येही खेळत होता. तो बंगळुरु बुल्स टीमचा सदस्य आहे.
- रोहितचा चुलत भाऊ मंजित चिल्लर पुणेरी पलटनकडून खेळतो.
या बातमी संबंधातील अपडेट divyamarathi.com देत राहिल...
पुढील स्लाइडमध्ये पाहा ललिताचा लग्नातील आणि इतर फोटो....
बातम्या आणखी आहेत...