आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नींचा आरटीआय: पतीचा पगार सांगा, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मागतात खासगी माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत - दहा वर्षांपूर्वी आरटीआय म्हणजेच माहितीच्या अधिकाराचा कायदा झाला. फायलींत बंद असलेले सत्य जनतेला समजावे हा त्याचा मुख्य उद्देश होता. आता तो बदलत चालला आहे. फायलींऐवजी लोक कौटुंबिक वस्तुस्थिती जाणून घेण्यातच जास्त रस दाखवू लागले आहेत. हरियाणात असेच काही रंजक प्रकार उघडकीस आले आहेत.
पानिपतच्या पोलिस विभागाकडे गेल्या सात महिन्यांत आरटीआयचे १०७४ अर्ज आले आहेत. त्यातील सुमारे सव्वाशे अर्ज पोलिस कर्मचाऱ्यांच्या पत्नींचे आहेत. त्या अर्जांमध्ये विचारलेले प्रश्न पाहा...

माझ्या पतीला किती पगार मिळतो?
ते कोणत्या पदावर कार्यरत आहेत?
त्यांनी किती सुट्या घेतल्या होत्या?
किती शिल्लक आहेत? ड्युटीची वेळ काय आहे?
ड्यूटीवर असताना ते काय काय करतात?

प्राप्त ६० अर्जांमध्ये तर मुलींच्या लग्नासाठी पोलिसांत काम करणाऱ्या अविवाहित कर्मचाऱ्यांची माहिती मागण्यात आली आहे. ३५० हून अधिक आरटीआय अर्ज घरगुती तंट्याबखेड्याशी संबंधित आहेत. त्यात पत्नीने पोलिसात कार्यरत असलेल्या आपल्या पतीशी संबंधित तर पतीने पत्नीशी संबंधित माहिती मागितली आहे. हुंड्यांसाठी छाळाबाबत एकमेकांचे जबाब आणि एफआयआरची प्रत मागितली आहे. केवळ हरियाणामध्येच असे अर्ज व त्यांत असे प्रश्न विचारले जात आहेत असे नव्हे. राजधानी दिल्लीतील परिस्थिती तर आणखीच अद््भुत आहे. दिल्लीत दरवर्षी ३० ते ३५ हजार अर्ज येतात. त्यात विचारलेले प्रश्न असे- दिल्ली पोलिसांचा शिपाई एका दिवसात किती कप चहा पितो? दिल्लीत किती बैलगाड्या चालतात? दिल्लीत किती हिरवी व किती सुकलेली झाडे आहेत?

आरटीआय कार्यकर्ते सुभाषचंद्र अग्रवाल यांनी या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आरटीआयचा दुरुपयोग करणाऱ्या लोकांवर अंकुश लावलाच पाहिजे, तरच या कायद्याचा मूळ हेतू कायम राहील, असे त्यांचे म्हणणे आहे.