आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री पत्नीने केला पतीला फोन, नाही उचलला तर घेतला असा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर - पंजाबमध्ये पतीच्या छळाला कंटाळलेल्या एका महिलेने माहेरी आत्महत्या केली आहे. महिलेच्या भावाने आरोप केला आहे की भाऊजी विदेशात जाण्यासाठी बहिणीला माहेराहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकत होता. पैसे आणत नाही म्हणून तिला त्रास देत होता.
4 वर्षांपूर्वी झाले होते लग्न
- मृत महिलेचा भाऊ कुलविंदर याने सांगितले, की मंगळवारी रात्री बहिणीने अरविंदरला फोन केला होता, मात्र त्याने फोन घेतला नाही.
- मृत महिलेची आई बलवीर कौरने सांगितले, की सुखविंदर कौरने अरविंदर सिंगला फोन केला होता की मला घ्यायला या, परंतू पतीने तिचे ऐकले नाही.
- सुखविंदर कौरचे चार वर्षांपूर्वी अरविंदरसिंग सोबत लग्न झाले होते.
- लग्नानंतरच अरविंदरसिंगने सुखविंदर कौरसोबत भांडणास सुरुवात केली होती.
- सुखविंदर कौरची सासू पुष्पा सैनी, नणंद बेजी आणि तिचा पती हरीश हे देखील मुलीला त्रास देत असल्याचे बलवीर कौरने सांगितले.
- सासरचे लोक मुलीचा मानसिक छळ करत होते.
- यांचे भांडण अनेकदा पंचायतीत गेले होते. सासरचे लोक मुलीचा हुंडा आणि पैशांसाठी छळ करत होते.
सुसाइड नोटमध्ये काय लिहले
- पोलिसांनी मृत सुखिंदर कौरने लिहलेली सुसाइड नोट जप्त केली आहे.
- त्यात पती, सासू, नणंद आणि तिचा पती मृत्यूसाठी जबाबदार असल्याचे लिहिले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सुसाइड नोट आणि मृत महिलेचे नातावाईक
बातम्या आणखी आहेत...