आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Will Fight To Make Andhra Pradesh Mosquito free In Two Years: N Chandrababu Naidu

मुख्यमंत्र्यांची घोषणा- आंध्र दोन वर्षांत करणार डासमुक्त! पहिले १००% डासमुक्त राज्य ठरणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयवाडा - आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राज्याला १००% डासमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. येत्या दोन वर्षांत राज्याला डासमुक्त करण्यासाठी सरकार सर्वंकष उपाययोजना करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ‘डासविरोधी युद्ध’ राज्य सरकारने सुरू केले आहे. दररोज यासाठी भरीव काम केले जाईल. दोन वर्षांत राज्य पूर्णपणे डासमुक्त होईल, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी चंद्राबाबूंनी डास निर्मूलन मोहिमेची तीव्रता प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडली. या परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी राज्याच्या वरिष्ठ मंत्र्यांचीही उपस्थिती होती. नायडू म्हणाले की,
श्रीलंकेने हे ध्येय गाठले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने श्रीलंकेला डासमुक्त देश म्हणून घोषित केले. दोन वर्षांनंतर ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशलाही डासमुक्त घोषित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आहे. राज्यातील ११० स्थानिक स्वराज्य संस्था आणि हजार खेड्यांमध्ये घरोघरी शौचालये असतील. उघड्यावर शौचास पूर्णपणे निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर योजना अंमलात आणणार आहे.
आंध्रठरेल पहिले पाणंदमुक्त राज्य :वर्ष २०१८अखेरीस आंध्र प्रदेश देशातील पहिले १००% पाणंदमुक्त राज्य ठरेल, असा विश्वास चंद्राबाबूंनी व्यक्त केला. महानगरपालिका, नगरपालिका ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक तिथे शौचालये बांधण्यात येतील. रायलसीमा प्रदेशातील दुष्काळावर पूर्णपणे मात करण्यासाठी राज्य सरकार प्राधान्याने योजनांची आखणी करत आहे. फवारा सिंचन, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाद्वारे रायलसीमा प्रांतातील पिकांना संरक्षण दिले जाईल.
वादळ पूर नियंत्रणाचे आव्हान
आंध्रप्रदेशसमोर वादळ पूर नियंत्रण ही दोन मोठी आव्हाने आहेत. यातील नुकसान कमी करण्यासाठी राज्य सरकार आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला अद्ययावत प्रशिक्षण देत आहे. जीवित संपत्तीची हानी कमी करण्यासाठी सतर्कता बाळगणारी यंत्रणा उभी करण्याकडे राज्य सरकार अग्रक्रमाने लक्ष देत आह, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...