आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Will LK Advani Address BJP's National Executive Meet?

लालकृष्ण अडवाणींना भाषणाचीही संधी नाही, आजपासून बंगळुरूत महत्त्वाची बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करणाऱ्या नेत्यांच्या यादीतून ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे नाव वगळण्यात आले आहे. यामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा मार्गदर्शन करतील. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अडवाणी बंगळुरू येथे पोहोचले असून त्यांचे नाव मार्गदर्शन करणाऱ्यांच्या यादीत आहे किंवा नाही, याबद्दल कोणीही ठोस माहिती देऊ शकलेले नाही. पक्षप्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी या बैठकीत सर्व ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करतील, असे म्हटले आहे. या बैठकीत भूसंपादनसह सर्व प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे. स्वच्छ भारत अभियान, निर्मल गंगा अभियान हे या बैठकीतील प्रमुख मुद्दे असतील.

भाजपची केंद्रात सत्ता आल्यानंतर ज्येष्ठ नेते अडवाणी यांना पक्षाने सर्व प्रमुख पदावरून दूर करून मार्गदर्शक म्हणून ठेवले अाहे. यात मुरली मनोहर जोशी व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही नावे आहेत.

हेपतुल्ला, मिश्रांना डच्चू : अल्पसंख्याक विभागाच्या मंत्री नजमा हेपतुल्ला व लघुउद्योग मंत्री कलराज मिश्र यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र देण्याची दाट शक्यता आहे. या दोघांना राज्यपालपदे दिली जाऊ शकतात. सध्या हिमाचल प्रदेश, मिझोरामसह काही राज्यांत पूर्णवेळ राज्यपाल नेमण्यात आलेले नाहीत.

दोनदिवसीय कार्यक्रम : बंगळुरू शुक्रवारपासून दोन दिवस बैठक होत असून शुक्रवारी सकाळी १० वाजता बैठक सुरू होईल. ११ वाजता पक्षाध्यक्ष अमित शहा बैठकीत मार्गदर्शन करतील.
मंत्रिमंडळ फेरबदल

बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात काही फेरबदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात असून जम्मू-काश्मीरमध्ये भाजपशी युती करून सत्तेत असलेल्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष व शिवसेना या दोन पक्षांना केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले जाण्याची शक्यता आहे.