आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंचभर जमीनही घेऊ देणार नाही : राहुल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगंगानगर- भूसंपादन विधेयकातील शेतकरी विरोधातील तरतुदी जोपर्यंत रद्द करणार नाही तोपर्यंत कितीही प्रयत्न केले तरी शेतकऱ्यांची इंचभरही जमीन घेऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला आहे. गुरुवारी श्रीगंगानगर, हनुमानगड भागात ९ किलोमीटर पायी चालत शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी ही टीका केली. यापुढे काँग्रेसमध्ये साडेतीन वर्षांपेक्षा जास्त काम केलेल्या नेत्यांनाच लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली जाईल, असे राहुल यांनी या वेळी सांगितले. लोकांच्या समस्या जाणून त्या संसदेत मांडण्यासाठी आपण विविध राज्यांत फिरत असल्याचेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...