आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या जबाबदारीत राजकारणाबद्दल बोलणार नाही: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- नव्या जबाबदारीमध्ये मी राजकारणाबद्दल बोलणार नाही, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. परंतु जनतेच्या कल्याणाच्या मुद्द्यांना मांडणार नाही, असा त्याचा मुळीच अर्थ होत नाही, असे नायडूंनी स्पष्ट केले.  

नायडू म्हणाले, एस. राधाकृष्णन व झाकीर हुसेन यांनी उपराष्ट्रपती पदाचा गौरव वाढवला. तीच परंपरा मला पुढे न्यायची आहे. आता ही जबाबदारी सांभाळताना मला राजकारणाबद्दल बोलायचे नाही. परंतु लोकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांवर आणि लोककल्याणाच्या मुद्द्यांवर मी बोलणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ते बुधवारी पत्रकारांशी बोलत होते. 

दारिद्र्य, निरक्षरता, आर्थिक असंतुलनामुळे देशात अनेक समस्या आहेत. राज्यसभेत सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील सदस्यांनाही आपले मत मांडण्याची संधी मिळावी, असे वाटते. कामकाजात सर्वांना बोलण्याची संधी देण्याचे काम मी करणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...