आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहाबुद्दीनला सीवानहून तिहारमध्ये हलवण्याचे सुप्रीम कोर्टाचे बिहार सरकारला आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहाबुद्दीनला सीवानहून तिहार तुरुंगात हलवण्याचे सुप्रीम कोर्टाचे बिहार सरकारला आदेश  शहाबुद्दीनवर चंदाबाबूच्या तीन मुलांच्या खुनाचा आरोप आहे. (फाइल) - Divya Marathi
शहाबुद्दीनला सीवानहून तिहार तुरुंगात हलवण्याचे सुप्रीम कोर्टाचे बिहार सरकारला आदेश शहाबुद्दीनवर चंदाबाबूच्या तीन मुलांच्या खुनाचा आरोप आहे. (फाइल)
पाटणा - सुप्रीम कोर्टाने राजद नेते आणि माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीनला बिहारच्या सीवान तुरुंगातून तिहार तुरुंगात हलवण्याचे आदेश दिले आहेत. अॅसिड कांडात साक्षीदारांवर दबाव टाकल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. शहाबुद्दीन बिहारमध्ये असेल तर न्याय मिळू शकणार नाही, असे पिटीशनमध्ये म्हटले आहे. 

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ट्रायल केसची सुनावणी 
- सुप्रीम कोर्टाने बुधवारी अॅसिड कांडाच्या सुनावणीदरम्यान चंदाबाबूंच्या याचिकेवर हा निर्णय दिला. 
- चंदाबाबूंच्या दोन मुलांची अॅसिड टाकून हत्या करण्यात आली होती. तसेच तिसऱ्या मुलाचीही नंतर हत्या झाली होती. 
- या हत्यांमागे शहाबुद्दीन असल्याचा आरोप आहे. 
- शहाबुद्दीनला आठवडाभरात तिहार जेलमध्ये शिफ्ट करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने बिहार सरकारला दिला आहे. 
- शहाबुद्दीनवर दाखल असलेल्या सर्व खटल्यांची सुनावमी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाणार आहे. 
- कोर्टाच्या या निर्णयानंतर चंदा बाबूंनी आता तरी त्यांना न्याय मिळेल अशा विश्वास दर्शवला आहे. 

काय आहे प्रकरण?
- जमीनीवर ताबा मिळवण्याच्या उद्देशाने 16 ऑगस्ट 2004 ला चंदा बाबू आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. 
- यावेळी बचावासाठी चंदा बाबूंचा मुलगा सतीश राजने अॅसिड फेकले. ते काही लोकांच्या अंगावर पडले. 
- 16 ऑगस्टला चंदा बाबूंच्या तिन्ही मुलांचे अपहरण करण्यात आले. 
- त्यापैकी दोघांची त्याच रात्री अॅसिडने अंघोळ घालत हत्या करण्यात आली. 

लग्नाच्या 18 व्या दिवशी तिसऱ्या भावाची हत्या 
- चंदा बाबूंचा मोठा मुलगा राजीव अपहरण कर्त्यांच्या तावडीतून पळण्यात यशस्वी झाला होता. 
- अनेक वर्ष तो गायब होता. नंतर 6 जून 2011 ला त्याने प्रत्यक्षदर्शी म्हणून साक्ष दिली. 
- 16 जून 2014 ला त्याचीही सीवानमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यावेळी त्याच्या लग्नाला फक्त 18 दिवस झाले होते. 
- शहाबुद्दीनवर चंदा बाबूंच्या तीन मुलांची हत्या करण्याचा आरोप आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...