आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Will Teach A Lesson To SP 'goons', Fumes Mayawati

सपाच्या गुंडांना धडा शिकवू : मायावती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - सत्तेत परतल्यास समाजवादी पार्टीच्या गुंडांना धडा शिकवू, असा सज्जड इशारा बसपाप्रमुख मायावती यांनी अखिलेश सरकारला दिला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन स्थळाजवळ बसपाने तीन कि.मी. परिसरात होर्डिंग्ज लावले होते. प्रशासनाने होर्डिंग्ज काढून टाकण्याची कारवाई केल्यानंतर मायावती यांनी सपावर निशाणा साधला.

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी लाखो लोक येथे येतील याची सरकारला जाणीव आहे. या दिवसानिमित्त देशभरात होर्डिंग्ज लावले जातात. त्यासाठी कुणाची परवानगी घेण्याची गरज नसते, असे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले. सपा सरकारची कार्यपद्धती माहीत असल्याने बसपाच्या कार्यकर्त्यांनी होर्डिंग्ज बसवण्यासाठी परवानगी घेतली होती, असा दावा करण्यात आला आहे. परिवर्तन स्थळाच्या तीन कि.मी. परिसरात होर्डिंग्ज लावण्यात आले होते. मात्र, शनिवारी सायंकाळी ज्या पद्धतीने ते हटवण्यात आले त्याचा बसपाने निषेध केला आहे. सपाच्या इशार्‍यावर काम करणार्‍या अधिकार्‍यांना सत्ता आल्यानंतर पाहून घेऊ, असा इशारा मायावतींनी दिला आहे.