आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wine Facilitate In Ac Coach Of Jaipur Mumbai Supper Fast Train

Sting: सामान्य तिकिटावर AC कोचमधून प्रवास, ऑन डिमांड मिळते सिगारेट आणि मद्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- तुम्ही सामान्य तिकिट काढले आहे. चिंता करू नका! टीटीई आणि AC कोच अटेंडन्ट तुम्हाल जनरल कोचमधून धक्केखात प्रवास करु देणार नाही. परंतु, ही सुविधा घेण्यासाठी तुम्हीला जयपूर रेल्वे स्टेशनवर जावे लागेल. येथे सामान्य तिकिटावर AC थ्री टायर कोचमधून आलिशान प्रवासाची सुविधा मिळते. पण ही सुविधा रेल्वे प्रशासनाकडून नव्हे तर टीटीई आणि कोच अटेंडन्टतर्फे दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

'भास्कर टीम'च्या प्रतिनिधींनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनने टीटीई आणि कोट अटेंडन्टच्या गोरखधंद्याचा भांडाफोड केला आहे. कोच टीटीईपासून कोच अटेंडन्ट खुलेआम जनरल तिकिट काढलेल्या प्रवाशांना AC कोचमध्ये बर्थ उपलब्ध करून देत आहेत. त्यांच्याकडून जास्त रुपये उकाळून त्यांना व्हीव्हीआयपी सुविधा उपलब्ध करून देत आहे. प्रवासादरम्यान स्पेशल जेवण (व्हेज, नॉनव्हेज), स्पेशल चहा एवढेच नव्हे तर ऑन डिमांड सिगारेट आणि मद्य उपलब्ध करून दिली जात असल्याचे उघड झाले आहे. यासाठी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा रुपये घेतले जात असून रेल्वे प्रशासनाला मात्र चूना लावला जात आहे.

'भास्कर टीम'ने जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसध्ये स्टिंग ऑपरेशन केले. जयपूर-मुंबई प्रवास करून टीटीई आणि कोच अटेंडन्टचा गोरखधंद्यांचा पर्दाफाश केला. टीमकडे जनरल तिकीट होते तरीदेखील त्यांना सहज AC कोसमध्ये बर्थ मिळाला. उल्लेखनिय म्हणजे त्यांना आलिशान सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. जयपूर ते मुंबईदरम्यान फक्त एकच टीटीई कोचमधील प्रवाशांचे तिकिटे तपासली. मात्र, टीमचे तिकिटही पाहिले नाही.

रतलाम जंक्शन
रात्री 9.30 वाजता कोच अटेंडन्ट सतीश पांडे आणि त्याचा सहकारी के. एम. शर्मा आले आणि त्यांनी ऑर्डर मागितली. 'भास्कर टीम'ने त्यांना जेवणाची ऑर्डर दिली. त्यावर ते म्हणाले सिगारेट आणि मद्यही उपलब्ध आहे. फक्त तुमचा ब्रॅंड सांगा. टीमने विचारले हे कसे काय? त्यावर उत्तर मिळाले चिंता करू नका, रतलाम स्टेशनवर सगळे काही उपलब्ध होते. रतलाम स्टेशनवरून गाडी पुढे निघाल्यानंतर कोच अटेंडन्टने जेवणासोबत मद्याची बाटली आणली.

कोल्ड्रिंकमध्ये मिसळली मद्य...
सतीश पांडे याने एसी कोचच्या दरवाज्यात उभे राहून मद्य कोल्ड्रिंकच्या बाटली टाकले आणि आमच्याकडे दिले. जेव्हा टीमने 'सिगारेट' मागितली तर के. एम. शर्मा याने 15 रुपयांत एक सिगारेट दिली.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, टीटीई ‍आणि कोच अटेंडेन्टचा हा गोरखधंदा...

(फोटो- जयपूर- मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून सामान्य तिकिटावर एसी कोचमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकाराचा 'भास्कर टीम'ने भांडा फोड केला आहे. रेल्वे एक्स्प्रेसमध्ये ऑन डिमांड सिगारेट आणि मद्य उपलब्ध करून दिली जात आहे.)