फोटो - ब्रेन हंट स्पर्धा २ विजेत्या मुलांसोबत भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल.
भोपाळ - दैनिक भास्कर समूहाच्या भास्कर चॅम्प्स क्लबतर्फे आयोजित ब्रेन हंट स्पर्धा २ च्या विजेत्यांना सोमवारी पुरस्कार प्रदान करण्यात आले. भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल व सीनियर व्हाइस प्रेसिडेंट(एसएमडी) विनय माहेश्वरी यांनी ४० विजेत्यांना गौरवले. स्पर्धेसाठी देशातील २ लाख ६७ हजार मुलांनी भाग घेतला होता. यामध्ये चार वेगवेगळ्या श्रेणी होत्या. यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलांनी सहभाग नोंदवला.
ब्रेन हंटचे गटनिहाय विजेते
श्रेणी एक : अदिती (चंदिगड), आदित्य सिंह (राजस्थान), अंकित शंखधर (चंदिगड), कार्तिकेय गौर (नवी दिल्ली) व किंजल रायजादा (राजस्थान) श्रेणी दोन : आतिश घोष (ग्वाल्हेर), अफ्सा अंजू (छत्तीसगड), हीरल दतवानी (राजस्थान), जगजित कौर (चंदिगड), जयेष नेगी (हरियाणा) श्रेणी तीन : आदिती शर्मा (नवी दिल्ली), दर्शन जैन (जयपूर), देवजित चौधरी (झारखंड), दिव्यांशू उमेश पारेख (इंदूर), हर्षदीप कौर मेहता (पंजाब) श्रेणी चार : अरिजित भट्टाचार्य (झारखंड), अरुण सूर्यवंशी (राजस्थान), भावदीप सिंह (पंजाब), हरप्रीत कौर (पंजाब), निकिता भाटिया (भोपाळ)
मुलांची सृजनशीलता मोठी
या वेळी रमेशचंद्र अग्रवाल म्हणाले, कालानुरूप मुलांची विचार व समजण्याची शक्तीही वाढली आहे. पालक व शिक्षक मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचे काम करत आहेत. यामुळे ते भविष्यात कोणतेही आव्हान पेलू शकतील.
टॅलेंटसाठी प्लॅटफॉर्म
मुलांच्या सृजनशीलतेला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी दैनिक भास्कर चॅम्प्स क्लब २०१० पासून सलग तीन वर्षे याचे आयोजन करत आहे. यामध्ये मुलांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.