जयपूर - दैनिक भास्करतर्फे आयोजित अखिल भारतीय हिंदी लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला अाहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना दैनिक भास्करकडून जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये जगविख्यात लेखकांशी भेटण्याची संधी मिळणार आहे. सर्व विजेत्यांना ५ हजारांचे रोख पुरस्कारही दिले जातील.
हिंदी भाषेची विद्यमान परिस्थितीत योग्य व्याख्या काय? आणि हिंदीला ग्लॅमर स्वरूप देता येईल काय? या विषयावर जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या सहकार्याने दैनिक भास्करने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी देशभरातून हजारो प्रवेशिका आल्या. निवड समितीत डॉ. अनिता नायर (व्याख्याता, हिंदी विभाग, राजकीय विद्यापीठ जयपूर), डॉ. उर्वशी शर्मा (सहायक प्राध्यापक, हिंदी विभाग, राजस्थान विद्यापीठ, जयपूर), मृदुला बिहारी (हिंदी लेखिका) यांचा समावेश होता. जयपूरच्या डिग्गी पॅलेसमध्ये २१ ते २५ जानेवारीदरम्यान जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम विजेते
दैनिक भास्करच्या स्पर्धेत मला विजेतेपद मिळाल्याचा आनंद आहे. माझ्यासाठी हा अविस्मरणीय क्षण असून यामुळे माझे हिंदी भाषेशी असलेले नाते अधिकच दृढ झाले.
अंकुर श्रीमाली, व्यवस्थापन शाखेचा विद्यार्थी, हरियाणा
द्वितीय विजेत्या
मी नाट्य कलाकार असून हिंदी भाषेशी माझे दृढ नाते आहे. हिंदीच माझी पहिली आवड आहे. दैनिक भास्कर बालपणापासूनच वाचत आहे.
देवप्रभा जोशी, नाट्य कलाकार, उदयपूर, राजस्थान
तृतीय विजेत्या
हिंदी भाषेप्रती जनजागृती तसेच प्रचार प्रसारासाठी घेतलेल्या या पुढाकारास भास्करचे धन्यवाद. पूर्वीपासूनच हे माझे आवडते वर्तमानपत्र आहे.
सुमयय अली, बीएस्सीची विद्यार्थिनी, भोपाळ, मध्य प्रदेश
उत्तेजनार्थ पुरस्कार विजेते
मोना सिन्हा (गया, बिहार), राकेश प्रकाश सिंह (जोधपूर, राजस्थान), पूजा गौतम (कोटा, राजस्थान), आस्था मालवीय (इंदूर-मध्य प्रदेश), वैशाली थापा (भिलवाडा-राजस्थान), आकांक्षा शर्मा (अलवर-राजस्थान), निशीत परमार (सारंगपूर-अहमदाबाद), गरिमा शर्मा (उदयपूर-राजस्थान), प्रेरणा कच्छवा (सिरसा-हरियाणा) ज्योती बिष्णोई (श्रीगंगानगर-राजस्थान) यांना दैनिक भास्करकडून प्रत्येकी पाच हजारांचे रोख पुरस्कार दिले जातील.