आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उष्णतेपेक्षा थंडीने २० टक्के मृत्यू अधिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - उन्हापेक्षा थंडीचा कडाका अधिक धोकादायक असल्याचा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. त्यात २० टक्क्यांहून अधिक मृत्यूमागे थंडी हे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. १९८५ ते २०१२ दरम्यान जगातील १३ देशांतील ३८४ प्रदेशांतील मृत्यूच्या घटनांच्या विश्लेषणावरून हा दावा करण्यात आला आहे.

लेसेंट या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासात पर्यावरण पातळीवरील वैविध्य आढळणार्‍या प्रदेशांची अभ्यासासाठी निवड करण्यात आली होती. त्यात थंड प्रदेशांपासून उष्णकटिबंधीय अशा सर्व प्रकारच्या प्रदेशांचा समावेश होता. लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिनचे प्रमुख लेखक डॉ. अँटोनियाे गेस्पारिनी म्हणाले, आतापर्यंत वातावरणातील वाढते तापमान मृत्यूमागील मोठे कारण मानले जात होते; परंतु याबाबत नवीन अभ्यासात सर्वात मोठी आकडेवारी संकलित करून त्याचे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. वातावरणातील चढ-उतारदेखील मृत्यूचे कारण मानला गेला. त्यात सामान्य थंडीच्या मोसमात अनेक मृत्यू होतात. २००३ मध्ये युरोपमध्ये उष्णतेच्या काळात ७० हजार जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्या प्रदेशाचे तापमान ४० अंश सेल्सियस असल्याचे दिसून आले होते. अर्थात त्या प्रदेशातील सरासरी तापमानापेक्षा त्यात ६० टक्के प्रमाण अधिक होते. वास्तवात मृतांमध्ये वृद्धांचा अधिक समावेश होता. त्यांना वातावरणातील बदल सहन होऊ शकला नाही.

तापमान कमी किंवा अधिक झाल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण ७.७१ टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिका, ब्रिटनमधील हे चित्र आहे. सर्वाधिक उष्णतेमुळे ०.४२ टक्के, तर थंडीमुळे ७.२९ टक्के मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

ब्रिटनमध्ये मृत्यूंत वाढ
ब्रिटनमध्ये यंदा तापमान १९ अंश सेल्सियस होते. त्यात देशभरात थंडीमुळे सर्वाधिक मृत्यू झाले. ८.५ टक्के मृत्यूमागे थंडीचे कारण सांगण्यात येते. विशेष म्हणजे तापमान १ अंशाने कमी झाले तरी जोखीम वाढते, असा इशारा संशोधकांनी दिला.
बातम्या आणखी आहेत...