आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विप्रो कंपनीला मागितली 500 कोटी रुपये खंडणी, अन्यथा रासायनिक हल्ला करण्याची धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
बंगळुरू - देशातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या विप्रोला एक धमकीचा ई-मेल आला आहे. यात अज्ञात इसमाने ५०० कोटी रुपयांची खंडणी मागितली असून ती बिटकॉइनच्या स्वरूपात (डिजिटल करन्सी) २० दिवसांत जमा करण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी ई-मेलमध्ये लिंकही देण्यात आली आहे. ही खंडणी दिली नाही तर विप्रोच्या कार्यालय परिसरात रासायनिक हल्ला करू, अशी धमकी देण्यात आली आहे. 
 
दरम्यान, हा धमकीचा मेल येताच विप्रोने आपल्या सर्व कार्यालयांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. शिवाय सायबर क्राइम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कंपनीला ही धमकी ramesh2@protomail.com या अॅड्रेसवरून आली आहे. 
 
जगातील सर्वात महागडे चलन बिटकॉइन 
बिटकॉइनहे चलन डिजिटल स्वरूपात असते. ते त्याच रूपात ठेवले जाते. विशेष म्हणजे यावर कोणत्याही देशाचे नियंत्रण नाही. सध्या बिटकॉइनचे मूल्य १,५०० डॉलर (सुमारे ९६,५७० रुपये) आहे. अभ्यासकांनुसार या वर्षअखेरीस या एका बिटकॉइनचे मूल्य हजार डॉलरपर्यंत (सुमारे १,२८,७६० रुपये) जाण्याची शक्यता आहे. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...