आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • With Eye On Space Debris, Isro Starts Countdown For PSLV Launch

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीएसएलव्ही उद्या झेपावणार; चार देशांचे उपग्रह नेणार अंतराळात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - अंतराळ क्षेत्रात भारत सोमवारी आणखी एक मोठी कामगिरी आपल्या नावावर नोंदवेल. इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या वतीने पीएसएलव्ही सी-23 रॉकेटच्या अंतराळ मोहिमेला 30 जून रोजी सुरुवात होईल. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे रॉकेट सकाळी 8 वाजून 52 मिनिटांनी अवकाशात झेपावणार आहे.

वास्तविक, रॉकेटचे उड्डाण सोमवारी सकाळी 9 वाजून 49 मिनिटांनी करण्याची योजना होती, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडेल. चेन्नईपासून 100 किलोमीटर अंतरावर हे केंद्र आहे.

स्पॉट-7 काय आहे?
पीएसएलव्हीमधून अंतराळात झेपावणार्‍या उपग्रहामध्ये सर्वाधिक चर्चा फ्रान्सच्या स्पॉट-7 उपग्रहाची आहे. हा उपग्रह पृथ्वीचे अत्यंत बारकाईने निरीक्षण करेल. त्यामुळे हवामान, वातावरण, भौगोलिक इत्यादी बदल आणि इतर अभ्यास करता येणार आहे. स्पॉट-7 हा भारताच्या रिमोट सेन्सिंग सिस्टिम (आयआरएसएस) प्रणालीसारखाच आहे.

पीएसएलव्हीचे यश
पोलर सॅटेलाइट लाँच व्हेइकल (पीएसएलव्ही) या रॉकेटच्या मदतीने इस्रोने विविध देशांच्या उपग्रहांचे आतापर्यंत यशस्वी लाँचिंग केले आहे. आतापर्यंत 35 उपग्रहांना अवकाशात स्थापित करण्यात इस्रोने मदत केली आहे.

किती देशांचा समावेश ?
फ्रान्स, सिंगापूर, कॅनडा, र्जमनी या देशांचे उपग्रह पीएसएलव्हीच्या साहाय्याने अंतराळात स्थिरावणार आहेत.