आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Without Solving People Problem Separate State State Issue Not Forward Reddy

लोकांच्या समस्यांचे निराकरणशिवाय राज्य विभाजन पुढे सरकणार नाही - रेड्डी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - शेवटचा चेंडू टाकल्याशिवाय सामना संपत नाही, असे सांगत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी लोकांच्या समस्यांचे निराकरण केल्याशिवाय राज्य विभाजन प्रक्रियेत पुढे जाणे कठीण असल्याचे म्हटले आहे.
रेड्डी यांनी राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, लोकांना काय हवे आहे, याबाबत पक्षाने गंभीर असले पाहिजे. पक्षाने आंध्र विभाजनाचा निर्णय घेतला आहे. यासाठी घटनात्मक पद्धतीचा अंगीकार करावा लागतो. नव्या राज्यनिर्मितीची प्रक्रिया रचनात्मक पद्धतीने सुरू आहे. यादरम्यान अनेक आंदोलनाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्याआधी लोकांची मते जाणून घेणे आवश्यक आहे.


राजकारणी आणि नागरिकांनी व्यक्त केलेल्या समस्या सोडवणे महत्त्वाचे आहे. विभाजन प्रक्रिया पुढे सुरू ठेवायची का आणि ती कशी? पुढे जाणार नसला तर मग करणार काय? सरकार आणि पक्षाला याबद्दल चिंता आहे, असे रेड्डी म्हणाले.
राजकीय गणितापेक्षा राज्यहिताला प्राधान्य राजकीय गणितापेक्षा राज्याचे हित महत्त्वाचे आहे. लोकांच्या समस्या त्यापेक्षा महत्त्वाच्या आहेत. पक्ष लोकांच्या इच्छेनुसार चालतो. लोकांच्या अडचणी दूर करणे सरकारचे कर्तव्य आहे, असे रेड्डी म्हणाले.