आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Witness In Asaram Bapu\'s Surat Rape Case Shot Dead

आसाराम यांच्याविरोधात साक्ष देणार्‍या साक्षीदाराची गोळ्या झाडून हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - गुजरातमधील सुरतच्या दोन बहिणींवर आसाराम यांनी बलात्कार केल्याच्या खटल्यातील प्रमुख साक्षीदार अखिल गुप्ता याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्री अखिल गुप्ता घरी परतत असताना त्याच्यावर मुझफ्फरनगरमधील नवी मंडी परिसरात गोळीबार करण्यात आला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अखिल आसाराम यांच्या आश्रमात त्यांचा स्वंयपाकी आणि खासगी सहायक म्हणून काम करत होता.
हल्लेखोरांनी अखिलवर फार जवळून गोळ्या झाडल्या. त्याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या त्यातील एक मानेत फसली होती, तर एक छातीतून आरपार गेली, तर एक गोळी त्याच्या शरीरातच होती.
अखिल गुप्ता हा आसाराम बापूंचा नोकर होता. सोबतच सुरत येथील बलात्कार प्रकरणी त्याला गुजरात पोलिसांनी अटकही केली होती. आसाराम यांच्यावरील बलात्काराच्या खटल्यामध्ये त्याने त्यांच्याविरोधात साक्ष दिली होती. त्याबरोबरच त्याला माफीचा साक्षीदार करुन आसाराम यांच्या विरोधात सरकारी साक्षीदार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे. अखिल गुप्तावर गोळ्या झाडून त्याचे मारेकरी फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
अखिलच्या कुटुंबियांनी सांगितले, की त्याचा स्वभाव मनमिळावू होता. त्याचा कोणासोबत वाद नव्हता. अखिलच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी हॉस्पिटल आणि पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. त्याचा भाऊ आशिष याने दोन अज्ञात बाइक स्वारांविरोधात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुझफ्फरनगरचे पोलिस अधिक्षक एच.एन.सिंह म्हणाले हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. लवकरच ते पोलिसांच्या तावडीत असतील.
गांधीनगर कोर्टात साक्ष नोंदविली होती
सुरतच्या दोन बहिनींनी आसाराम आणि त्यांचा मुलगा नारायण साई याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात अखिल प्रमुख साक्षीदार होता. त्याने गांधीनगर येथील एका कोर्टात साक्ष नोंदविली होती.
आसाराम सध्या जोधपूर तुरुंगात आहे. येथे त्यांच्यावर अल्पवयिन विद्यार्थीनीच्या लैंगिक शोषणाचा खटला सुरु आहे.

पुढील स्लाइडमध्ये, कोण होता अखिल गुप्ता
फोटो - हॉस्पिटलमध्ये अखिल गुप्ता आणि त्याच्या शेजारी पोलिस आणि हॉस्पिटलचा स्टाफ.