आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाटलेल्या कपड्यांमध्ये ठाण्यात पोहोचली; म्हणाली, दीर रेप करून बनवतोय व्हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - येथील एका पोलिस ठाण्यात एक महिला फाटलेल्या कपड्यांसह अचानक धडकली. तिने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, ''माझा दीर 4 महिन्यांपासून बलात्कार करत आहे. रेप करताना त्याने माझे व्हिडिओ सुद्धा बनवले आहेत." आजही त्याने या महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, कसेबसे घटनास्थळावरून पळ काढून ती पोलिस ठाण्यात या अवस्थेत पोहोचली आहे. 

 
व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची धमकी
- हे प्रकरण आग्राच्या इंद्रपुरी परिसरातील आहे. येथे राहणारी महिला दीपा (काल्पनिक नाव) हिचा पती आणि पतीचा चुलत भाऊ दोघे ड्रायव्हर आहेत. एकमेकांचे दररोज घरी येणे-जाणे होते. 
- पीडितेने सांगितल्याप्रमाणे, 4 महीन्यांपूर्वी तिचा दीर मद्यधुंद अवस्थेत घरात घुसला आणि तिच्यावर बळाचा वापर करून बलात्कार केला. तसेच मोबाईल फोनमध्ये क्लिप सुद्धा बनवली. 
- ही गोष्ट तिने पतीला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दीराने तिला तो व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिली होती. एवढेच नव्हे, तर राग आल्यास तुझ्या मुलाचे अपहरण करून मारून टाकेन असेही त्याने धमकावले होते.
- या धमक्यांमुळे ती प्रचंड घाबरली होती. त्याचाच गैरफायदा घेत नराधमाने तिच्यावर सलग 4 महिन्यांपासून बलात्कार केला. यासोबत, ब्लॅकमेल करून तिचे दागिणे, मोबाईल आणि 25 हजार रुपये रोख सुद्धा घेतले. आता महिलेकडे काहीच उरले नव्हते.
 

पोलिस ठाण्यात येण्यापूर्वी काय झाले?
- रविवारी सकाळी-सकाळी महिलेचा पती कामावर गेला होता. घरात ती एकटीच होती. आरोपी दीराने याची माहिती मिळताच घरात शिरकाव केला. तसेच 20 हजार रुपयांची मागणी केली. महिलेने नकार दिला तेव्हा शिवीगाळ आणि मारहाण सुद्धा केली.
- यानंतर त्याने महिलेच्या अब्रूवर हात टाकला आणि बळजबरी करत मारहाण करायला लागला. त्याने पीडितेचे कपडे सुद्धा फाडायला सुरुवात केली. 
- याचवेळी महिलेने घरात दिसले ते उचलून त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला आणि घटनास्थळावरून पसार झाली. यानंतर पोलिस ठाणे गाठण्याचे धाडस केले. त्याच अवस्थेत पोलिसांकडे पोहोचून मदतीच्या याचना केल्या.
 

आरोपी काय म्हणाला..?
- महिलेला अशा दाहक अवस्थेत पाहून पोलिस सुद्धा विचलीत झाले होते. त्यांनी पीडितेला धीर देऊन उपचारासाठी रुगणालयात पाठवले. तसेच आरोपी दीराला परिसरात जाऊन पकडले. 
- पोलिसांनी त्याच्या विरोधात बलात्कारासह सायबर गुन्हेगारीच्या कलमा सुद्धा लावल्या आहेत. 
- तर, आरोपीने स्वतःला निर्दोष म्हणत आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. भावासोबत मारहाण झाल्यानंतर वहिणीनेच आपले कडपे फाडले आणि पोलिसांत जाऊन माझ्या विरोधात खोटी तक्रार केली.
बातम्या आणखी आहेत...