आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिलेचा भावाने केला होता 20 हजारात सौदा, आता पती विकत आहे मुलगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुरादाबाद (उत्तर प्रदेश) - आज आपण जग जिंकण्याची भाषा करत असलो तरी आपल्याकडील समाजव्यवस्था ही स्त्रियांना भोगवस्तूपेक्षा जास्त महत्त्व द्यायला तयार नाही. एखाद्या महिलेला सहजरित्या खरेदी केले जाऊ शकते, तिचा वापर झाल्यानंतर तिचीच काय तिच्या पोटच्या गोळ्याचीही विक्री केली जाऊ शकते. हे एखाद्या कथा-कादंबरीतील प्रकरण नाही तर मुरादाबादमधील सत्य घटना आहे.

येथे आसामच्या एका महिलेच्या खरेदी-विक्रीचे प्रकरण समोर आले आहे. पीडितेने सांगितल्यानुसार दीड वर्षांपूर्वी तिच्या पतीने 20 हजार रुपयांमध्ये तिला खरेदी केले होते. तिच्यावर खर्च केलेली ही रक्कम वसूल करण्यासाठी आता तिच्या पतीने तिच्या 6 महिन्यांच्या मुलाचा सौदा केला होता.

ही घटना मुरादाबादच्या सूर्यनगरची आहे. नगराच्या नावात सूर्य असला तरी येथे काळ्या धंद्यांची जंत्री आहे. पीडितेने तिची आपबीती सांगितली. ती म्हणाली, 'मी आसामच्या दिसपूर जिल्हातील आमवाडी ख्योसपूरची रहिवासी आहे. आई-वडील वारल्यानंतर मावशीच्या घरी राहायला गेले होते. दीड वर्षांपूर्वी मावशीचा मुलगा राहुलने मला- तुला कामाला लावतो, चांगले आयुष्य जगता येईल असे सांगून येथे आणले. येथे आणून त्याने मला एका माणसाला विकले. त्या व्यक्तीने राहूलला 20 हजार रुपये देऊन मला खरेदी केले होते.'

महिलेने सांगितल्यानुसार, त्या माणसाने तिला जबरदस्ती स्वतः जवळ ठेवून घेतले. लग्नासाठी तिच्यावर बळजबरी केली. या बळजबरीच्या नात्यातून तिला एक मुलगाही झाला.

...20 हजार रुपये वसूल करायचे होते
पीडितेने सांगितले, 'माझे त्या पुरुषासोबत लग्न झाले असले तरी माझ्या आणि माझ्या मुलाच्या पालन पोषणाचा खर्च मीच भागवते. येथील काही घरांमध्ये धुणी-भांडी करुन मी माझ्या मुलाचे पोट भरते.'
'त्यानंतरही त्या नराधमाला माझ्यावर खर्च केलेले 20 हजार रुपये वसूल करायचे आहे. त्यासाठी त्याची माझ्या 6 महिन्याच्या बाळाची विक्री करण्याची तयारी चालू होती. याचू कुणकूण लागल्यानंतर मी माझ्या बाळाला घेऊन तिथून पळाले.'

न्यायासाठी फिरते या दारातून त्या दारात
> महिलेने सांगितले की त्याच्या तावडीतून निसटल्यानंतर मी सर्वप्रथम पोलिस स्टेशन गाठले. पोलिस आयुक्त नितीन तिवारींची भेट घेतली. त्यांना सर्व आपबीती ऐकवली, मात्र पोलिसांनी माझी काहीही मदत केली नाही.
> पोलिस आयुक्तांकडून न्याय मिळाला नाही तेव्हा पीडितेने महिला पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. मात्र तिथेही तिची निराशा झाली.
> महिलेने म्हटले की मी त्याच्या घरातून पळाले आहे. आता मला व माझ्या मुलाच्या जीवाला त्याच्यापासून धोका आहे. तो आमची हत्या करेल.
> पीडितेचे म्हणणे आहे, 'मला परत आसामला जायचे आहे. माझी फक्त एवढीच विनंती आहे की मला माझ्या घऱी परत पाठवा. मी त्या नराधमाकडे आता जाणार नाही.'
पुढील स्लाइडमध्ये, भावाने सुंदर आयुष्याचे स्वप्न दाखवून केली बहिणीची विक्री...
बातम्या आणखी आहेत...