आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुर्चिला बांधून महिला इंजिनिअरला जिवंत जाळले, चप्पल पाहून आईने ओळखले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांधकाम सुरु असलेल्या घरात फक्त राख आणि खुर्चीचा सापळा पडलेला होता. लाल वर्तूळात महिला इंजिनिअरची चप्पल. - Divya Marathi
बांधकाम सुरु असलेल्या घरात फक्त राख आणि खुर्चीचा सापळा पडलेला होता. लाल वर्तूळात महिला इंजिनिअरची चप्पल.
मुझफ्फरपूर (बिहार) - येथील एका महिला इंजिनिअरला खुर्चीला बांधून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी एक चपचेला जोड आणि फक्त हडे सापडली आहेत. इंजिनिअरच्या आईने चप्पल पाहून मृतदेह मुलीचा असल्याचा दावा केला आहे. घटनास्थळी एक चिठ्ठी देखील सापडली आहे. पोलिसांनी प्रथमदर्शनी ही हत्या असल्याची शंका व्यक्त केली आहे.
पतीपासून वेगळी राहात होती इंजिनिअर महिला..
- मृत इंजिनिअरचे नाव सरिता देवी असून घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत तिने आईला मुलांची काळजी घेण्यास सांगितले आहे.
- मुझफ्फरपूर येथील मुरौल येथे मनरेगाच्या कामावर जेई पदी महिलेची नियुक्ती होती.
- हे प्रकरण रविवारी रात्री, कोल्हुआ बजरंग येथील एका बांधकाम सुरु असलेल्या घरात घडले आहे.
- सोमवारी सकाळी परिसरातील नागरिकांनी पोलिसांना सुचना दिली, त्यानंतर पोलिस निरीक्षक विश्वंभर चौधरी घटनास्थळी पोहोचले.
- चौधरी यांनी सांगितल्यानुसार, महिलेचे शरीर जळून कोळसा झाले होते, केवळ सापळा उरला होता.
- पोलिसांना शंका आहे, की पेटवून देण्यासाठी केमिकलचाही वापर झाला असावा. इंजिनिअरची आई कुसुमदेवी यांनी मृतदेहाची ओळख पटवली.
पतीसोबत सुरु होता वाद
- महिला इंजिनिअरचे पती विजयसिंह यांच्यासोबत भांडण सुरु होते. ते गावातच राहात होते.
- महिला इंजिनिअर एका मुलाला घेऊन येथे राहात होती. घटनेच्या दिवशी मुलगा आजीच्या घरी गेलेला होता. दुसरा मुलगा ध्रुव दरभंगा येथे पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत आहे.
पोलिस काय म्हणाले
- सोमवारी रात्री घटनास्थळाची पाहाणी केल्यानंतर पोलिस अधीक्षक विवेककुमार म्हणाले, प्रथमदर्शनी ही हत्या असल्याचे दिसत आहे.
- त्यांनी सर्व बाजूंनी तपास केला जाणार असल्याचे सांगितले. पोलिस अधीक्षकांच्या पाहाणीनंतर घराला सील करण्यात आले आहे.
तीन वर्षांपासून मुरौल येथे राहात होत्या महिला अधिकारी
- सरिता या मुळच्या सीतामढी येथील कन्हौली फुलकाहा येथील रहिवासी होत्या. गेल्या तीन वर्षांपासून ते मुरौल डिव्हिजनमध्ये जेई पदावर नियुक्त होत्या.
- त्या येथे बजरंग विहार कॉलनीमध्ये विजयकुमार गुप्ता यांच्या घरात भाड्याने राहात होत्या. विजय हे मनरेगाच्या विविध योजनांचे इस्टिमेट तयार करण्याचे काम करतात.
- ज्या ठिकाणी सरिता यांचा मृतदेह जळालेल्या आवस्थेत सापडला, ते निर्माणाधिन घरही विजय यांच्याच मालकीचे आहे. सरिता येथे बसून ऑफिसचे खासगी काम करीत असायच्या.
केमिकल टाकून जाळले ?
- सोमवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे कळाल्याने लोक घराभोवती गोळा झाले होते. कोणालाही आत जाऊ दिले जात नव्हते. मात्र काही शेजारी बळजबरी आत घुसले.
- त्यांनी पाहिले की एका खुर्ची जळालेली आहे. तिथेच एक चप्पल पडलेली होती. पायाचे एक जळालेले हाडही लोकांच्या नजरेस पडले.
- तोपर्यंत पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाली होती. प्राप्त माहितीनुसार केमिकल टाकून महिलेला जाळण्यात आले, जेणे करुन कोणताही पुरावा राहू नये.
- लोकांनी सांगितल्यानुसार महिला अधिकारी रविवारी सायंकाळी दिसल्या होत्या. त्यांनी आकाशी आणि क्रिम रंगाची सलवार कमीज परिधान केलेली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मृत महिला जेईचे फोटो आणि तक्रार देण्यासाठी आलेली आई आणि मुलगा..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...