आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman College Student Hit With Sickle, Attacker Then Drank Poison

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर केला कुर्‍हाडीने हल्ला, स्वत:ही घेतले विष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः जखमी विद्यार्थिनीला सुजाता रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे)

हैदराबाद- आयटी सिटी म्हणून देशात प्रचलित असलेल्या हैदराबादमध्ये एका तरुणाने इं‍जिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर कुर्‍हाडीने हल्ला केला. नंतर स्वत: विष घेऊन आत्महत्या केली. विद्यार्थिनीला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्‍यात आले असून तिची प्रकृती च‍िंताजनक आहे.

रावली असे जखमी विद्यार्थिनीचे नाव असून ती ओरोरा इंजिनिअरिंग कॉलेजमधील बीटेकच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावली ही सोमवारी सकाळी 9 वाजता कॉंलेजमध्ये पोहोचली. ती कॉलेजमध्ये प्रवेश करत असताना आरोपी प्रदीप याने अचानक तिच्यावर कुर्‍हाडीने दोन वार केले. रावलीची मान आणि हातावर गंभीर दुखापत झाली. काही कळण्याच्या आतच आरोपी प्रदीप याने घटनास्थळी विष घेतले. कॉलेज स्टाफने दोघांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले. आरोपी प्रदीप याचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला. तर रावलीवर उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे.
रावली हिने 20 दिवसांपूर्वी कॉंग्रेसमध्ये अॅडमिशन घेतल्याचे कॉलेजच्या प्राचार्या श्रीलता यांनी सांगितले. मयत आरोपी प्रदीप हा सेंट्रल इन्सिट्यूट ऑफ टूल डिझाइनचा विद्यार्थी होता.
प्रदीप मागील दोन वर्षांपासून रावलीचा पाठलाग करत होता. रावलीने याप्रकरणी प्रदीप विरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली होती.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीने केला आत्महत्येचा प्रयत्न...