आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला कमांडोंकडून नक्षलींचा खात्मा, कधीकाळी होत्या स्वत:च नक्षलवादी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगदलपूर - छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील नक्षलवादाने प्रभावित दुर्गम भाग. तेथे पहिल्यांदाच महिला कमांडोंनी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. बस्तरमध्ये असे प्रथमच घडले. या तिन्ही महिला कमांडो स्वत: नक्षलवादी होत्या. दीड वर्षापूर्वी त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिसांनी त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन कमांडो बनवले.

काही नक्षलवादी इंद्रावती नदी पार करून बास्तानारकडे येत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस, डीआरजी आणि एसएफची संयुक्त पथके जंगलात पाठवली. शुक्रवारी सकाळी सांगवेलजवळ नदीकिनारी हे नक्षलवादी दिसले. नक्षल्यांना पोलिसांची भनक लागली आणि त्यांनी हल्ला केला. दोन्ही बाजूने दोन सुमारे दोन तास गोळीबार चालला. त्यात महिला कमांडोंनी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला.
या कारवाईत महिला कमांडो प्रमिला कश्यप, फुलो मरकाम आणि कोसी सहभागी होत्या. कधीकाळी नक्षलवादी होत्या. पोलिसांनी त्यांना प्रशिक्षण देऊन कमांडो बनवले. नक्षलवादी कसा हल्ला करू शकतात हे माहीत होते. त्यामुळे रणनीती समजण्यास उशीर लागला नाही. परिणामी एन्काउंटर सोपे गेले, असे प्रमिलाने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...