आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन वर्षांचा मुलाला दिली फाशी, स्वतः घेतला गळफास, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझियाबाद (उत्तर प्रदेश)- येथील एका महिलेने काल सायंकाळच्या सुमारास दोन वर्षांच्या चिमुकल्याला फाशी दिली. त्यानंतर स्वतःही गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. या दरम्यान चिमुकला जोरदार ओरडला. त्याचा आवाज ऐकून शेजारी धावून आले. त्यांनी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पण दोघांचाही मृत्यू झाला. माहेरच्यांनी केलेल्या आरोपांवरुन पोलिसांनी सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
असे आहे हे प्रकरण
- रिना असे पत्नीचे तर अमीत असे पतीचे नाव आहे. त्यांना आरव नावाचा दोन वर्षांचा मुलगा आहे. - माहेरुन पैसे आणण्यासाठी अमीत आणि त्याचे कुटुंबीय रिनाला त्रास द्यायचे.
- अमीत एका खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याचे कुटुंबीय गावी राहतात. पण तेथून फोन करुन ते माहेरुन पैसे आणण्यासाठी दबाव टाकायचे.
- याची तक्रार रिनाने माहेरी केली होती. माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांची समजूत घातली होती.
- पण तरीही काही फरक पडलेला नव्हता. गेल्या काही दिवसांपासून रिनाचा त्रास वाढला होता.
- त्यामुळे रिनाने आत्महत्येचा निर्णय घेतला असावा असा पोलिसांना संशय आहे.
- आत्महत्येनंतर रिनाच्या माहेरच्या लोकांनी पती आणि सासरच्या लोकांवर आरोप केला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...