आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला कॉन्स्टेबल होती विवाहित प्रियकरासोबत, पत्नी पोहोचली तर असे काढले बाहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस खाते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. - Divya Marathi
पोलिस खाते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे.
शाहजहांपूर (उत्तर प्रदेश) - प्रियकरासोबत प्रेम रंगात रंगलेल्या महिला कॉन्स्टेबलच्या प्रेमात भंग तेव्हा पडला जेव्हा तरुणाच्या पत्नीने पोलिसांना घेऊन तिच्या घरावर छापा टाकला. पोलिसांनी युवकासोबत अश्लिल चाळे करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलला अटक केली आहे. कॉन्स्टेबलने तरुणाला आपल्या घरी बोलावले होते, मात्र त्याची पत्नी पोलिसांना घेऊन आली आणि दोघांना तुरुंगात डांबले. 
 
पतीला रंगेहाथ पकडण्यासाठी पत्नीने वापरला हायटेक फंडा
- प्रकरण शाहजहांपूर येथील मालगोदाम रोड येथील आहे. येथे राहाणारा करण जिल्हा हॉस्पिटलमध्ये अॅम्ब्यूलन्स ड्रायव्हर आहे. 
- करणच्या पत्नीने सांगितल्यानुसार, महिला कॉन्स्टेबल आणि करणचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध सुरु आहे. यावरुन करणचे घरात पत्नीसोबत भांडणही होत होते. 
- करणच्या पत्नीने सांगितले, '5 वर्षांपूर्वी आमचे लग्न झाले. एक मुलगाही आहे. रविवारी रात्री करण काम असल्याचे सांगून घराबाहेर पडला. मीही त्याला अडवले नाही.'
- 'मला माहित होते त्याला कुठे जायचे आहे. त्याला पकडण्यासाठी मी एक नवीन सिम खरेदी केले होते. तो घराबाहेर पडल्यानंतर मोबइलमध्ये नवीन सिम टाकले आणि त्याला फोन केला. विचारले, तू कुठे आहे? तो म्हणाला, शाहजहांपूरमध्ये. माझी शंका खरी ठरली. मी तत्काळ महिला कॉन्स्टेबलचे घर गाठले. घराबाहेरून पतीला फोन केला आणि त्याचवेळी पोलिसांना सुचना दिली.'
- पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि महिला कॉन्स्टेबलसह त्याला पकडले. दोघांना पोलिस स्टेशनला नेण्यात आले. मात्र महिला पोलिस असल्याने पोलिस आता कारवाईत दिरंगाई करत आहे. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. 
- मीडियालाही तपास सुरु आहे, यापेक्षा जास्त काही सांगत नाही. 
- ठाणे अंमलदार सुनील म्हणाले, गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. यापुढे पोलिस काहीच बोलत नाही. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसे काढले घराबाहेर...
बातम्या आणखी आहेत...