आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांनी मृत्यूचा नजारा पाहिला लाइव्ह, रेल्वे इंजिनमध्ये अडकून 100 मीटर फरफटत गेली महिला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांदा (उत्तर प्रदेश) - बांदा येथील रेल्वेरुळ पार करताना एका महिलेने केलेली घाई तिच्या जीवावर बेतली. मॉर्निंग वॉकवरुन घरी परत येत असलेली महिला पॅसेंजर रेल्वे ट्रॅकवर असताना रुळ पार करण्याच्या प्रयत्नात होती. रेल्वे इंजिनच्या हुकात महिला अडकली आणि 100 मीटरपर्यंत फरफटत गेली. त्यानंतरही एक तास महिला वेदनेने विव्हळत आणि मदतीसाठी ओरडत होती. मात्र रेल्वे कर्मचारी फक्त टुल्स शोधत राहिले.

रेल्वे कर्मचारी - आरपीएफ, जीआरपी बघ्याच्या भूमिकेत
- ही दुर्दैवी घटना बांदा शहरापासून जवळच संकटमोचन मंदिर रेल्वे लाइनजवळ झाला.
- रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करुन घरी परत येत असलेल्या मालती रेल्वे रुळ ओलांडत असताना बांदा-कानपूर पॅसेंजरच्या इंजिनच्या हुकमध्ये अडकल्या.
- मालती या हुकमध्ये अडकून 100 मीटर पर्यंत रेल्वेसोबत फरफटत गेल्या. त्यानंतरही एक तास त्या रेल्वेखाली अडकून होत्या. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
- रेल्वे प्रशासनाचा हलर्गीपणा आणि असंवेदनशीलतेच्या त्या बळी ठरल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
- मालती रेल्वे इंजिनमध्ये अडकल्यानंतर काही अंतरावर जाऊन गाडी थांबली. त्यानंतर आरपीएफ, जीआरपीचे जवान, रेल्वे कर्मचारी तिथे पोहोचले. मात्र कोणीही मदतीला पुढे आले नाही.
- महिला गंभीर जखमी होती. वेदनेने विव्हळत असलेल्या महिलेला सोडवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही.

वाचला असता जीव
- प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, की जर महिलेला वेळेवर बाहेर काढले असते आणि उपचार मिळाले असते तर तिचा जीव वाचला असता.
- लोकांचा रोष वाढल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी महिलेला काढण्यासाठी अवजारांची शोधाशोध सुरु केली, मात्र तोपर्यंत फार उशिर झालेला होता.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...