आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या रेल्वेत दलित महिलेवर गँगरेप, नराधमांनी फेकले खाली, पाय गमवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मऊ- उत्तर प्रदेशात धावत्या पॅसेंजर गाडीत एका दलित महिलेवर सामुहीक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल‍ी आहे. इतकेेच नाही तर, नराधमांंनी पीडितेला धावत्या गाडीतून खाली फेकले. त्यात पीडितेला एक पाय गमवावा लागला आहे. महिलेला गंंभीर अवस्थेेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे.

सासरी जात होती महिला...
- मऊ जिल्ह्यातील काझा खुर्द रेल्वे रुळाजवळ महिला गंभीर अवस्थेेत सापडली.
- महिला शनिवार सायंंकाळी औंणीहार- तमसा (55136) पॅसेंजर गाडीने जौनपूूर येेथे जात होती.
- प्रवासादरम्यान गाडीत दोन नराधमांंनी तिच्यावर बलात्कार केला. पीडिता बेशुद्ध पडल्याचे पाहाताच नराधमांंनी तिला धावत्या गाडीतून खाली फेेकलेे.

काय म्हणाले गावकरी?
- गावकरी कैलास यादव यांनी सांगितले की, रविवारी सकाळी ते शेतात जात होते. काझा खुर्द रेल्वे लाइनजवळ त्यांना एका महिलेचा आवाज आला.
- कैलास यादव आवाजाच्या दिशेने गेले असता त्यांना एक महिला विवस्त्र अवस्थेेत आढळूून आली. त्यांंनी गावातून साडी मागवून पीडितेच्या अंंगावर टाकली. पोलिसांंना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले.
- नंतर 108 अँम्‍बुलन्स बोलवून तिला हॉस्पिटलमध्ये हलवले.

- डॉ. रूपेश राय यांनी सांगितले की, पीडितेवर उपचार सुरु आहेत. तिचा उजवा पाय रेल्वेखाली कापला गेला आहे.
- महिला दलित असल्याचे बोलले जात आहे. तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी तिला बनारस येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

वैद्यकीय तपासणीत समोर येईल खरी माहिती...
- एसओ जीआरपी सुधीर कुमार सिंह यांनी सांगितले की, पीडितीवर गँगरेप झाला आहे की, नाही हे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर समोर येणार आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, घटनेेशी संंबंंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...