आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Gangraped In Uttar Pradesh Kannauj, Left Tied Naked To Tree

UP मुख्यमंत्र्यांच्या पत्नी डिंपल यांच्या मतदारसंघात दलित महिलेवर सामूहिक बलात्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नौज ( उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचा लोकसभा मतदारसंघ कनौजमध्ये एका दलित महिलेवर गँगरेप करण्यात आला आणि नंतर विवस्त्र अवस्थेत झाडाला बांधून ठेवण्याचे प्रकरण समोर आले आहे. गावातील सरपंचाच्या मुलाने मित्रांसह हे कांड केले असल्याच आरोप आहे. आरोपीचे नाव सर्वेश यादव असून तो शिक्षक आहे. पोलिसांनी सुरवातीला एफआयआर दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केल्याचा देखील आरोप आहे. मात्र, आंदोलनानंतर त्यांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे.
सरपंचाच्या मुलावर आरोप
सरपंचाचा मुलगा सर्वेश यादववर आरोप आहे, की त्याने 16 ऑगस्टच्या सायंकाळी मित्रांसह हे दुष्कृत्य केले. महिला शेतात काम करत असताना आरोपींनी हे कृत्य केले. गँगरेपनंतर आरोपींनी पीडितेला तिच्याच साडीने झाडाला बांधले आणि फरार झाले. या प्रकरणी गावकर्‍यांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आणि सोमवारी सर्वेश यादवला अटक केली. पोलिस अधिक्षक सुभाष शाक्य म्हणाले, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आम्ही आता रिपोर्ट येण्याची वाट पाहात आहोत. मेडीकल रिपोर्ट आल्यानंतर तत्काळ कारवाई केली जाईल.
पहिल्यापासून होती वाइट नजर
पीडितेचा आरोप आहे, की सर्वेश नेहमी छेडछाड करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने शेतीसाठी जमीन देण्याचे आश्वसन देऊन फसवण्याचा प्रयत्न केला होता. पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की सर्वेशच्या छेडछाडीची मी पतीला माहिती दिली होती. कारण त्याचे गावातील मातब्बर घराणे आहे यामुळे आम्ही शांत बसलो. शनिवारी सायंकाळी जेव्हा मी शेतात काम करत होते, तेव्हा तो मित्रांसोबत तिथे आला आणि त्याने माझ्यासोबत दुष्कर्म केले. माझी साडी फेडून विवस्त्र अवस्थे झाडाला बांधले.
सर्वेश यादवचा आरोप
आरोपी सर्वेशने पीडित महिलेवरच आरोप केला आहे. त्याचे म्हणणे आहे, की महिलेने अरविंद जाटव याचे शेत बळकावले आहे. मी अरविंदची बाजू मांडत असल्यामुळे माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. तर, पीडितेच्या पतीने सर्वेशच्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. गावातील प्रत्येकाला त्याचे कारनामे माहित असल्याचे ते म्हणाले.