आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर 6 महिन्यातच झाले बाळ, पती म्हणाला अनौरस, पत्नीनेही सोडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा (राजस्थान)- येथील जेकेलोन हॉस्पिटलमध्ये एक विचित्र घटना घडली. नॉर्मल डिलिव्हरी होऊन एका तरुणीने गुटगुटीत मुलीला जन्म दिला. त्यानंतर तरुणीच्या सासरच्या लोकांनी मुलगी अनौरस असल्याचे सांगितले. तिला आम्ही स्वीकारणार नाही असे स्पष्ट केले. सहा महिन्यांपूर्वीच आमच्या मुलाशी या तरुणीचे लग्न झाले होते, असे स्पष्टीकरण सासरच्या लोकांनी दिले आहे.
वाचा याबाबत काय सांगितले तरुणीच्या पतीने
- डिलिव्हरी होण्यापूर्वीच पतीने सांगितले होते, की आमच्या लग्नाला केवळ सहा महिने झाले आहेत. अशा वेळी एवढ्या लवकर बाळ कसे काय होऊ शकते... हे बाळ माझे नाही.
- पतीने नकार दिल्यानंतर तरुणी म्हणाली, की मी या बाळाला कुठे ठेवू... तरुणीच्या माहेरच्या लोकांनीही बाळाला स्वीकारण्यास नकार दिला आहे.
- या बाळाला सोडून जाण्याची तयारी या कुटुंबाने केली होती. पण हॉस्पिटलच्या सेक्युरिटी इन्चार्जला याची माहिती मिळाली. त्याने कुटुंबाला जाऊ दिले नाही.
- तरुणीच्या वडीलांशी चर्चा केल्यावर सत्य समोर आले. त्यानंतर याची माहिती रुग्णालयाच्या प्रशासनाला देण्यात आली.
- तरुणीच्या वडीलांसोबत काय चर्चा झाली याची माहिती मीडियाला देण्यात आली नाही. पण या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
कुठे राहिल बाळ
- हॉस्पिटलचे अधिक्षक डॉ. आर. के. गुलाटी यांनी सांगितले, की तरुणीचे कुटुंबीय बाळाला स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळे आम्ही गायनी विभागाला या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया करण्यास सांगितले आहे.
- सध्या बाल कल्याण समितीजवळ हे बाळ आहे. त्यांनी शिशूगृहात बाळाला ठेवले आहे.
- बाळाचे वजन सामान्य असून प्रकृती उत्तम आहे. महिलेला डिस्चार्ज देण्यात आले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या.... आणखी काय झाल्या घडामोडी... रिपोर्टरला फॅमिलीने काय सांगितले.....
बातम्या आणखी आहेत...