आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिड-एअर डिलिव्हरी, बाळाला मिळाल्या आयुष्यभराच्या फ्री एअर तिकीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- दुबई येथून फिलिपिन्समधील मनिला येथे जात असलेल्या विमानात एका महिला प्रवाशाला प्रसुती कळा सुरु झाल्या. विमानातील कॅबिन क्रू आणि इतर प्रवाशांनी तिला मदत करण्याचा प्रयत्न केला. पण काही केल्या महिलेला आराम पडत नव्हता. या दरम्यान महिलेने बाळाला जन्म दिला. त्यामुळे तातडीने हैदराबाद विमानतळावर विमान उतरवण्यात आले. बाळ प्रिमॅच्यूअर असले तरी आरोग्यदायी आहे.
विशेष म्हणजे मिड एअर प्रसुती झाल्याने विमान कंपनीने बाळाला 1,000,000 गेट गो पॉईंट दिले आहेत. त्यामुळे हे बाळ अगदी आयुष्यभर फुकट विमान करु शकेल. सेबू पॅसिफिक एअर असे या विमान कंपनीचे नाव आहे. या महिलेची सहप्रवासी मेस्सी बार्बरेब उमंडल हिने फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा संपूर्ण घटनाक्रम.... मेस्सी बार्बरेब उमंडल हिने आणखी काय सांगितले....
बातम्या आणखी आहेत...