आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman IAS Has Been Called Eye Candy In Telangana

मॅगझिनने \'आय कॅंडी\' म्हटल्याने भडकली IAS, म्हटले- हा तर महिलांचा अपमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- एका मॅगझिनने 'आय कॅंडी' म्हटल्याने आणि वादग्रस्त कार्टुन प्रसिद्ध केल्याने एक महिला आयएएस अधिकारी प्रचंड संतापलेल्या आहेत. त्यांनी मॅगझिनला कायदेशीर नोटीस बजावली आहे. माफी मागितली नाही तर गुन्हेगारी स्वरुपाचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला आहे.
सीनिअर आयएएस अधिकारी स्मिता सबरवाल यांनी एक न्युज चॅनलला माहिती देताना सांगितले, की मॅगझिनने देशातील महिलांची माफी मागायला हवी. हा देशाचा अपमान आहे. दुसरीकडे, मुख्य सचिव राजीव शर्मा यांच्या आदेशावरुन मॅगझिनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका इंग्रजी चॅनलला माहिती देताना स्मिता सबरवाल यांनी सांगितले, की मी 14 वर्षे नोकरी केली. या लेखाने मी खुप दुःखी झाली आहे. एका महिला ब्युरोक्रॅटला अशा प्रकारे टार्गेट केले जाते तर देशातील महिलांचा तर विचारही करायला नको. त्याही अशा चुकीच्या पत्रकारितेच्या शिकार होऊ शकतात. आम्ही समोर येऊन हे मोडून काढले पाहिजे. मी अनेक जिल्ह्यांमध्ये शासकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. असे यापूर्वी कधीही झाले नाही.
काय आहे प्रकरण
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या निकटवर्तीय असलेल्या स्मिता सबरवाल यांना एका मॅगझिनने नुकतेच 'आय कॅंडी' (डोळ्यांना आकर्षित करणारी.) असे म्हटले होते. या आर्टिकलचे हेडिंग होते, 'नो बोरिंग बाबू.' यात लिहिले होते, की प्रत्येक मिटिंगमध्ये नवनवीन साड्या घालणाऱ्या या महिला आयपीएस फॅशन स्टेटमेंट सिद्ध झाल्या आहेत. मिटिंगमध्ये असलेल्या लोकांसाठी त्या आय कॅंडी असतात.
या मॅगझिनमध्ये आलेल्या कार्टुनमध्ये स्मिता यांना रॅम्पवॉक करताना दाखविले आहे. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री टी. चंद्रशेखर राव फोटो काढताना दाखविले आहेत. राज्यातील इतर नेते यावेळी त्यांना तिखट नजरेने बघत आहेत. स्मिता यांनी हैदराबादमध्ये एका फॅशन शोला उपस्थिती दर्शवली होती. त्यावर हे कार्टुन बेतले आहे.
काय म्हणाले, मॅगझिन
मॅगझिनच्या प्रशासनाने म्हटले आहे, की आम्ही कुणाचाही उल्लेख केलेला नाही. स्मिता यांचे नाव घेतलेले नाही. दुसरीकडे राजकीय पक्षांनीही मॅगझिनवर टीका केली आहे. कॉंग्रेसचे नेते ए. राजेंद्र रेड्डी म्हणाले, की कार्टुनच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांच्या लुक्स आणि ड्रेसवर टिप्पणी करणे चुकीचे आहे. त्यांना आय कॅंडी म्हणणे चुकिचेच आहे.
पुढील स्लाईडवर बघा, वादग्रस्त कार्टुन... यावरच त्या चिडल्या आहेत... स्मिता सबरवाल यांचे फोटो....