आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकलीने झोपेत अंथरुन ओले केले, आईने गुप्तांगात टाकली मिरची पूड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्मक छायाचित्र
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये दत्तक मुलीने अंथरुन ओले केल्यामुळे आईने तिच्या गुप्तांगात मिरचीची पूड टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण
पश्चिम बंगालमधील 24 परगना जिल्ह्यातील टीकागड येथील ही घटना आहे. सहा वर्षांच्या मुलीला आरोपींनी चार वर्षांपूर्वी शेजारी राहात असलेल्या कुटुंबाकडून दत्तक घेतले होते. गुरुवारी रात्री मुलीने झोपेत अंथरुन ओले केल्याने महिला संतप्त झाली आणि तिने चिमुकलीच्या गुप्तांगात लाल मिरची पूड टाकली. यामुळे मुलीच्या शररीराची आग होऊ लागली आणि ती बेशुद्ध पडल्यानंतर तिला उपचारासाठी हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिस आयुक्त म्हणाले, ही घटना धक्कादायक आहे. सर्वप्रथम मुलीला योग्य उपचारांची गरज आहे. त्यानंतर तिला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी काउंसलिंग केले जाईल.
विनाआई-बापाची मुलगी
पोलिसांनी सांगितले, की मुलीच्या वडिलांचे निधन झाले असून तिची आई तिला सोडून गेली आहे. त्यानंतर याच (आरोपी) कुटुंबाने तिचा सांभाळ केला. मुलीला दत्तक घेतलेली आई याआधीही तिला मारहाण करत होती. डॉक्टरांचे म्हणणे आहे, की लहान मुलांनी अंथरुन ओले करणे ही फार मोठी समस्या नाही. त्यांना योग्य पद्धतीने समजावून सांगतले तर हा त्रास कमी होऊ शकतो. वयाबरोबरच ही सवय सुटते, पण तसे झाले नाही तर त्यावर उपचार देखील उपलब्ध आहेत. पालकांनाही या समस्येतून मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते, असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.
बातम्या आणखी आहेत...