आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: 125 फुट ऊंच टाकीवरुन तरुणीने घेतली उडी, दैव बलवत्‍तर म्‍हणून वाचला जीव!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पाण्‍याच्‍या टाकीवरुन उडी मारताना युवती)

अम्बाला – परिवाराला कंटाळलेल्‍या आणि नैराश्‍येने ग्रासलेल्‍या 20 वर्षीय तरुणीने सनातन धर्म मंदिर जवळील 125 फुट ऊंच पाण्‍याच्‍या टाकीवरुन खाली उडी मारली. पण दैव बलवत्‍तर म्‍हणून ती वाचली.

किरण अम्बाला येथे आपल्‍या मैत्रिणीकडे आली होती. परंतु मैत्रिणीचे तिला घर सुध्‍दा माहित नव्‍हते. म्‍हणून तिने जीवनयात्रा कायमची संपवावी म्‍हणून टाकीवरुन उडी घेतली. परंतु खाली जमलेल्‍या लोकांनी कंबलमध्ये तिला कॅच करण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु तो असफल ठरला. ती सरळ 125 फुटावरुन चिखलात पडली. चिखलात पडल्‍याने ती वाचली. पोलिसांनी तात्‍काळ तिला रुग्‍णालयात दाखल केले असून तिच्‍यावर उपचार सुरु आहेत.

युवतीला वाचवण्‍यासाठी पोलिस आणि लोक खाली उभे होते. दोघांनी घोंगडे घेवून तिचा कॅच करण्‍याचा प्रयन्त केला. परंतु घोंगड्यावरुन ती वर उडाली आणि नजिकच्‍या चिखलात जावून पडली. जर युवती सरळ खाली पडली असती तर 50 टक्‍केही तिची जगण्‍याची उमेद नसती. परंतु लोकांनी दाखविलेल्‍या समयसूचकतेमूळे ती वाचू शकली.

‘’लोकांनी तिला कॅच करण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यामुळे आणि ती चिखलात पडल्‍यामुळेच ती वाचू शकली. अन्‍यथा एवढ्या उंचीवरुन उडी घेणारा जगण्‍याची शक्‍यता कमी असते.’’- डॉ. एसके गुप्ता, एचओडी, फिजिक्स विभाग, केयूके यांनी सांगितले.

उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहे किरण
एवढ्या उंचीवरुन उडी घेतल्यानंतर किरणची शुध्‍द हरपली होती. तिला हॉस्‍पीटलमध्‍ये दाखल केल्यानंतर रात्री 9:10 वाजता ती शुध्‍दीवर आली आहे. तिने अद्याप परिवाराची माहिती दिली नाही. परंतु दिव्य कृपाल पीजी कॉलेज हरदोई कॉलेजमध्‍ये बीए अंतीम वर्षाला ती प्रवेशित असल्‍याचे समजले.

पुढील स्लाइडवर पाहा घटनेची LIVE छायाचित्रे...