आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Jumps From Building To Escape Rapists Boyfriend Among 3 Held

बलात्काराच्या भीतीने युवतीची छतावरून उडी, डोक्याला जबर दुखापत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हावडा- पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील लिलुआ गावात एका युवतीने कथित बलात्कारापासून वाचण्यासाठी इमारतीच्या छतावरून उडी घेतल्याची घटना घडली. या प्रकरणी तिच्या तीन आरोपी मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे.

पाेलिसांच्या मते, रविवारी सायंकाळी पीडित युवती दोन मित्रांसोबत हुगळी जिल्ह्यातील रिशडा गावावरून लिलुआच्या पॅराबागान भागातील आपल्या अन्य एका मित्राकडे आली होती. दरम्यान, युवकांनी मद्यप्राशन करून तिलाही पाजण्याचा प्रयत्न केला. यावरून युवतीला काहीतरी अघटित घडण्याची भीती वाटू लागल्याने तिने थेट छतावरून उडी मारली. यात ती जखमी झाली. युवकांनी तिला तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

लिलुआ पोलिस ठाण्यात आरोपी युवकांिवरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना लवकरच न्यायालयापुढे हजर केले जाईल.