आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नापूर्वी प्रेयसीने घेतला प्रियराकाचा जिव, नंतर समोर आले असे काही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किशनगंज (बिहार)- तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरूणाचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. हत्ये मागील काऱण एका माहिलेसोबत अनैतिक संबंध असताना दूसऱ्या तरूणीसोबत लग्न असल्याचे सांगण्यात येत आहे. तरूणीला कळाले की तिचा प्रियकर दुसऱ्या तरूणीशी लग्न करत आहे, तेव्ह तिने आपल्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्याची हत्या केली.


काय आहे संपूर्ण प्रकरण...
मृत सौरव फीनो बँकेत काम करत होता. सौरव 21 ऑक्टोबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार बँक मॅनेजरने केली होती. यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. एसडीपीओ कामिनी बाला यांनी सांगितले की, हत्येच्या प्रकरणात पोलिस प्रेयसी बिंदूची चौकशी करत आहेत. सौरवचे महिलेसोबत असलेल्या संबंधाची देखील चौकशी करण्यात येत आहे. तो बुधवारी महीन गावात कलेक्शनसाठी गेला होता. पाच ठिकाणी कलेक्शन केल्यानतंर तो लीला देवीच्या घरी पोहोचला.  लीला अनाधिकृतपणे बँकेकडून कर्ज देऊन लोकांकडून वसूली करण्याचे काम करते. त्यामुळे सौरवचे तिच्या घरी येणे-जाणे होते. हत्येच्या दिवशीही तो महिलेकडे कलेक्शनसाठीच गेला होता.


लीलाच्या घरी आला होता सौरव...
- एसडीपीओने सांगितले की, सौरव संध्याकाळी पाच वाजता महिलेच्या घरी कलेक्शनसाठी पोहोचला होता. रात्री आठ वाजता लीलादेवीने रंजीत पासवान, मंगल दास, साकिब, जुबेर आणि जमाल यांच्या सहकार्याने धारदार शस्त्राने त्याची हत्या केली आणि मृतदेह गाडून टाकला.
- एसडीपीओने सांगितले की, लीला देवी, रंजीत पासवान, मगंल दास आणि साकिब यांना अटक करण्यात आली आहे. तर जुबेर आणि जमाल याच्या अटकेसाठी पोलिस छापेमारी करत आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...