आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीची हत्या करून सूटकेसमध्ये ठेवली डेडबॉडी; प्रियकराला वाचवण्‍यासाठी भावाला अडकवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड- पंजाबमधील मोहाली शहरातील बहुचर्चित एकम हत्याकांडप्रकरणी खरी माहिती उजेडात आली आहे. एकमची हत्या त्याची पत्नी सीरत हिनेच केल्याचे स्पष्ट झाले आहे. 5 दिवसांच्या पोलिस रिमांडनंतर सीरतची तुरुंगात रवानगी झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तब्बल 87 दिवसांनी कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. सीरतने प्रियकराला वाचवण्यासाठी भावाला या प्रकरणात अडकवल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

चार्जशीटनुसार, एकमची निर्घृण हत्या करून सीरतने त्याची डेडबॉडी सूटकेसमध्ये पॅक केली होती. या हत्याकांडात तिचा प्रियकराने तिला मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

काय आहे हे प्रकरण...?
- सीरत आणि एकम या दोघांमध्ये नेहमी खटके उडत होते. 18 मार्च 2017 रोजी एकमची हत्या झाली होती. पोलिसांनी 19 मार्चला त्याची पत्नी सीरत हिला अटक केली होती.
- सीरत आणि एकमची आधी झटापटी झाली. नंतर सीरतने त्याच्यावर गोळी झाडली. त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
- सीरतने पतीचा मृतदेह सूटकेसमध्ये पॅक करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होती.
- सूटकेस कारच्या डिक्कीत ठेवण्यासाठी सीरतने ऑटो ड्रायव्हरची मदत घेतली. मात्र, ड्रायव्हरच्या हाताला रक्ताचे डाग लागल्याने त्याने आरडाओरड केल्याने सीरतचे बिंग फूटले.
- सीरतने तेथून बळ काढला होता. सगळ्यात तिने भावाला फोन केला. एका पार्कमध्ये काही वेळ बसल्यानंतर ती ब्यूटी पार्लरमध्ये निघून गेली.
- पोलिसांनी सीरतला तिच्या मित्राच्या घरी ताब्यात घेतले. नंतर तिने प्रियकराला वाचवण्यासाठी सख्ख्या भावाला अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना सीरत विरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर तिच्या भावाला पोलिसांनी क्लिनचीट दिली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. घटनेशी संबंधित फोटो..