आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका फोटोमुळे कळला पत्नीचा कारनामा, 6 महिन्यांच्या प्रेमासाठी पतीचा काढला काटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी महिला नीरू व तिचा मृत पती भूषण. तिने प्रियकरासह मिळून भूषणचा खून केला. - Divya Marathi
आरोपी महिला नीरू व तिचा मृत पती भूषण. तिने प्रियकरासह मिळून भूषणचा खून केला.
कुरुक्षेत्र - हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातील बाबैन गावात एका महिलेने आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी प्रियकरासह कट रचला. पतीच्या मृत्यूला पत्नीने आजारपण असल्याचे सांगून गावात प्रचारित केले होते. गावातील भूषणची पत्नी नीरूनेच प्रियकर रिंकूच्या म्हणण्यावर आजारापणातून सावरणाऱ्या पती भूषणच्या औषधात सल्फास मिसळले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून कोर्टात हजर केले असता, त्यांची तुरुंगात रवानगी झाली.

6 महिन्यांपूर्वी झाले प्रेम- बनले संबंध; 7 वर्षांच्या संसाराची क्षणात केली राखरांगोळी
- भूषणचा छोटा साला आणि निरूचा भाऊ लक्कीचे लग्न मे महिन्यात यमुनानगरमधील रिंकुच्या चुलत बहिणीशी झाले होते. तेव्हा रिंकू करवला (सकोन्या) बनून नीरूच्या माहेरी आला होता. त्यादरम्यान रिंकू व नीरूची ओळख झाली.
- यानंतर काही दिवसांनी मन्सूरपूरमध्ये नीरूच्या माहेरात देवीचे जागरण झाले. यात नीरू आणि रिंकूही त्याच्या गावातून आला होता. येथे दोघांची ओळख प्रेमात बदलली. रिंकू नेहमी भूषणच्या गैरहजेरीत नीरूला भेटायला यायचा. भूषण याचा संशय आला तेव्हा नीरूने त्याला बहाणा केला.
 
अगोदर पळून जाणार होते, पण रचला खुनाचा कट
- दोन मुलांची आई नीरू आणि रिंकूने लग्नाचा निर्णय घेतला होता. ते पळून जाऊन लग्न करणार होते.
- एसएचओ दलीप सिंह म्हणाले, चौकशीत दोघांनी हे कबूल केले, परंतु स्थानिकांमुळे त्यांनी पळून जाणे टाळले आणि भूषणलाच संपवण्याचा कट रचला.
- 3 महिन्यांपूर्वी रिंकूने नीरूला एक औषध आणून दिले. ते तिने जेवणातून भूषणला खाऊ घातले. भूषण पोटात इन्फेक्शन झाल्याने आजारी पडला. कुटुंबीयांनी त्याला मोठ्या रुग्णालयात दाखल केले. तेथे तो ठीक झाला.
 
अगोदर शिंपडले परफ्यूम, मग दिला सल्फासचा डोस
- कट फसल्यानंतर दोघेही लाडवा येथे भेटले. रिंकूने नीरूला सल्फास आणि परफ्यूम दिले. व्हॉट्सअॅपवर रिंकू तिला निर्देश देत होता की, कसे व काय करायचे आहे.
- 13-14 ऑक्टोबरच्या रात्री नीरूने अगोदर खोलीत परफ्यूम शिंपडले. कारण कोणालाही सल्फासचा वास येऊ नये. यानंतर औषधात सल्फास मिसळून ती भूषण दिली.
- त्या रात्री भूषणचा भाऊ विनोदही दुकानात परतल्यावर त्याला वेगळाच वास आला होता. पण तेव्हा त्याला संशय आला नाही.
 
फोटोच्या गरजेमुळे उलगडले सत्य...
- भूषणच्या अंत्यविधीवर श्रद्धांजली देण्यासाठी कुटुंबीयांनी फोटो मागितला. तेव्हा नीरूच्या मोबाइलमधून फोटो घेण्यासाठी व्हॉट्सअॅप ऑन केले तेव्हा रिंकू आणि नीरूमध्ये झालेली चॅटिंग समोर आली.
- कुटुंबीयांनी लगेच नीरूच्या वडिलांनाही कळवले. अगोदर दोन्ही कुटुंबांनी रिंकू व नीरूच्या संबंधांबाबत आपल्या लेव्हलवर चौकशी केली. जेव्हा खात्रीलायक पुरावे मिळाले तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितले. मग बाकीचे सगळे काही या आरोपींनी पोलिसांजवळ कबूल केले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...